रोहित शर्माच्या कामगिरीकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

श्रीलंका दौऱ्यातील पहिला सराव सामना आजपासून
कोलंबो - प्रशिक्षक, सहप्रशिक्षक, सल्लागार यांच्या नियुक्तीने भारतीय क्रिकेट गेले काही दिवस चर्चेत होते. आता उद्यापासून (ता. २१) मैदानातील कामगिरीकडे लक्ष जाईल, अशी अपेक्षा आहे. श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर काही तासांतच भारतीय संघाचा सराव सामना सुरू होईल, त्यात रोहित शर्मा, के. एल. राहुल यांच्या कामगिरीकडे जास्त लक्ष असेल. 

भारत आणि अध्यक्षीय संघ यांच्यातील दोन दिवसांचा सराव सामना उद्यापासून सुरू होईल. त्यात ऑक्‍टोबरमध्ये यापूर्वीची कसोटी खेळलेल्या रोहितला जास्त प्राधान्य देण्यात येईल. तो इंग्लंड, बांगलादेश, तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत खेळला नव्हता. 

ऑस्ट्रेलिया मालिकेत सहा अर्धशतके केलेला राहुल खांदा दुखावल्यामुळे आयपीएल, चॅंपियन्स स्पर्धा, तसेच विंडीज दौऱ्यात नव्हता. अर्थात बीआरसी ग्राऊंडवरील हा सामना सरावच असेल. त्यात सर्व फलंदाजांचा, तसेच गोलंदाजांचा प्रयोग करता येईल. कर्णधार विराट कोहली, तसेच मार्गदर्शक रवी शास्त्री या लढतीद्वारे गोलंदाजांची चाचणी घेतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news watch on rohit sharma Performance