आम्ही टी-२० क्रिकेटच खेळणार - डॅरेन सॅमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

बार्बाडोस - क्रिकेट विंडीज यांच्याबरोबर असलेल्या मानधनाच्या वादावरून प्रमुख क्रिकेटपटूंना राष्ट्रीय संघापासून दूर ठेवले जात आहे. त्याचा निषेध म्हणून आता आम्ही फक्त विविध देशांतील टी-२० लीगच खेळणार. आम्हाला परत बोलावले तरी जाणार नाही, अशी भूमिका घेतली असल्याचे डॅरेन सॅमी याने सांगितले. मंडळाशी असलेल्या या संघर्षामुळेच ख्रिस गेल, किएरॉन पोलार्ड, ड्‌वेन ब्राव्हो, सॅमी यांना सातत्याने राष्ट्रीय संघापासून दूर ठेवले जात आहे. ‘आम्हाला कुटुंब चालवायचे आहे. त्यामुळे आमच्यासमोर लीग खेळण्यावाचून पर्याय नाही. आम्हाला तेथे अधिक पैसे मिळतात, असेही सॅमी याने सांगितले.

Web Title: sports news we will play t-20 cricket