सीईओ जोहरींना का अडवले?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 July 2017

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि प्रशासक समिती (सीओए) यांच्यातील तेड आता अधिकच वाढू लागली आहे. ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेला बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना का अडवले, याबाबत गुरुवारी प्रशासक समितीने ‘बीसीसीआय’ला नोटीस बजावली.

समितीची नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना, सचिव अमिताभ चौधरी, खजिनदार अनिरुद्ध चौधरी या तिघांनीही दुजोरा दिला आहे. प्रशासक समितीने सादर केलेल्या तिसऱ्या अहवालात जोहरी यांना ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधी म्हणून गृहीत धरावे, असे स्पष्ट म्हटले होते. यानंतरही ‘बीसीसीआय’ पदाधिकाऱ्यांनी काल विशेष सर्वसाधारण सभेत जोहरी यांना सदस्य नसल्याचे सांगून सभेत प्रवेश दिला नव्हता. जोहरींना कुठल्या  मुद्यावर अडवले याचे उत्तर प्रशासक समितीला हवे आहे. त्यांच्यासह व्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर यांनाही बैठकीस बसू दिले नव्हते.

‘बीसीसीआय’मध्ये आल्यापासून आजपर्यंत जोहरी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बैठकीला उपस्थित राहिले आहेत. त्यामुळेच अचानक पदाधिकाऱ्यांनी जोहरी यांना रोखल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Why did the CEO Zohri block?