शून्य धावात  चार विकेट

पीटीआय
सोमवार, 3 जुलै 2017

लंडन - महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हॅन निएकर्क हिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शून्य धावात ४ गडी बाद करण्याची कामगिरी केली. महिला आणि पुरुष एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अशी कामगिरी करणारी ही पहिली गोलंदाज आहे. तिच्या गोलंदाजीचे पृथ्थकरण ३.२-३-०-४ असे होते. तिच्या कामगिरीने दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा डाव २५.२ षटकांत अवघ्या ४८ धावांत गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेने ६.२ षटकांत बिनबाद ५१ धावा करून विजय मिळविला.  यापूर्वी क्रिकेटमध्ये तिन महिला, तर एका पुरुष क्रिकेटपटूने शून्य धावात तीन गडी बाद केलेे आहेत. यात ऑलिव्हिया मॅग्लो (ऑस्ट्रेलिया, १९९७ वि.

लंडन - महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हॅन निएकर्क हिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शून्य धावात ४ गडी बाद करण्याची कामगिरी केली. महिला आणि पुरुष एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अशी कामगिरी करणारी ही पहिली गोलंदाज आहे. तिच्या गोलंदाजीचे पृथ्थकरण ३.२-३-०-४ असे होते. तिच्या कामगिरीने दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा डाव २५.२ षटकांत अवघ्या ४८ धावांत गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेने ६.२ षटकांत बिनबाद ५१ धावा करून विजय मिळविला.  यापूर्वी क्रिकेटमध्ये तिन महिला, तर एका पुरुष क्रिकेटपटूने शून्य धावात तीन गडी बाद केलेे आहेत. यात ऑलिव्हिया मॅग्लो (ऑस्ट्रेलिया, १९९७ वि. पाक) संदामली डोलावट्टे (श्रीलंका, २०१२ वि. बांगलादेश), ॲरन ब्रिंडल (इंग्लंड, २०१३ वि. विंडीज) या महिला, तर रिची बेनॉ (१९५९, वि. भारत) या एकमेव पुरुष खेळाडूचा समावेश आहे. 

Web Title: sports news women cricket