महिलाही आफ्रिका दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 January 2018

मुंबई - देशांतर्गत महिला क्रिकेट स्पर्धेत सातत्याने धावा करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय महिला संघ फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत उपविजेतेपद जिंकल्यानंतरची भारतीय महिला संघाची पहिलीच लढत असेल. 

ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका जागतिक स्पर्धेचा (२०१७-२०२०) भाग असल्यामुळेच होत आहे. ही मालिका झाल्यावर पाच सामन्यांच्या ट्‌वेंटी- २० मालिकेस सुरवात होईल. या ट्‌वेंटी- २० मालिकेसाठी संघाची निवड काही दिवसांतच होणार असल्याचे भारतीय मंडळाने कळवले आहे. 

भारतीय संघ - मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), सुषमा वर्मा, एकता बिश्‍त, स्मृती मानधना, पूनम यादव, पूनम राऊत, राजेश्‍वरी गायकवाड, जेमिमा रॉड्रिग्ज, झूलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, मोना मेश्राम, पूजा वस्त्रकार, वेदा कृष्णमूर्ती, तानिया भाटिया (यष्टिरक्षक). 

एकदिवसीय लढतींचा कार्यक्रम : २ फेब्रुवारी - सराव सामना (ब्लोएमफाउंटन), ५ फेब्रुवारी - पहिली वन-डे (किम्बर्ली),  ७ फेब्रुवारी - दुसरी वन-डे (किम्बर्ली), १० फेब्रुवारी - तिसरी वन-डे (पॉत्शेस्त्रूम).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news women cricket team on africa tour