भारतीय महिलांची जेतेपदाची संधी पावसामुळे दुरावली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 February 2018

सेंच्युरियन - एकदिवसीय मालिकेपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकाही जिंकण्याची भारतीय महिलांची संधी किमान बुधवारी तरी पावसामुळे दुरावली गेली. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांदरम्यानचा मालिकेतील चौथा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मालिकेतील अखेरच्या पाचव्या सामन्यात भारतीय महिलांना पुन्हा एक संधी मिळेल. हा सामना हरल्यास मालिका २-२ अशी बरोबरीत सुटेल.

चौथ्या सामन्यात आज केवळ १५.३ षटकांचा खेळ झाला. लिझेली ली (नाबाद ५८) आणि डेन व्हॅन निएकर्क (५५) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने ३ बाद १३० धावा केल्या. त्यानंतर आलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

पाऊस थांबेल आणि खेळ सुरू होईल असे गृहीत धरून डकवर्थ लुईसचे कोष्टकही तयार केले होते. त्यानुसार १५ षटकांचा खेळ झाल्यास १४१, १० षटकांत ९५ आणि ५ षटकांत ६५ धावा असे सुधारित आव्हान भारतासमोर ठेवण्यात आले होते. मात्र, पावसाचे सातत्य कायम राहिले आणि सामना रद्द करण्यात 
आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news women t-20 cricket match rain