आफ्रिकन सफारीची डबल बारने सांगता

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 February 2018

केपटाऊन - मेलबर्नमध्ये जागतिक जिम्नॅस्टिकमध्ये अरुणा रेड्डी ब्राँझपदक जिंकण्याचा इतिहास घडवत असताना दक्षिण आफ्रिकेत महिला क्रिकेट संघानेही ऐतिहासिक कामगिरी केली. अखेरचा सामना जिंकून टी-२० मालिकाही खिशात टाकली आणि दक्षिण आफ्रिकेत प्रथम एकदिवसीय आणि आता टी-२० मालिका प्रथमच जिंकण्याचा महापराक्रम केला.

भारतीय महिलांनी एकदिवसीय मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखले. आता पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-१ अशी जिंकली.

मितालीच्या धडाकेबाज ६२ धावांच्या खेळीमुळे प्रथम फलंदाजी करताना भारताने १६६ धावा उभारल्या. हे आव्हान यजमानांना पेलवलेच नाही. १८ षटकांतच त्यांचा डाव ११२ धावांत गारद झाला. 

मंबईच्या जेमिमा रॉड्रिग्जनेही ठसा उमटवला. आक्रमक फलंदाज म्हणून उदयास येत असलेल्या जेमिमाला आज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी देण्यात आली. तिने ३४ चेंडूत ४४ धावा करताना मितालीसह दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. याच जेमिमाने आक्रमक फलंदाज मरिझाने कापचा सीमारेषेवर हवेत उंच सूर मारून पकडलेला झेल दाद मिळवणारा होता. सीमारेषेच्या दोन इंचच तिचा पाय दूर होता. शिवाय हवेत उडी मारल्यानंतरही तिने अचूकपणे तोल सांभाळला.

भारतीयांनी आफ्रिकेच्या सात फलंदाजांना एकेरी धावांतच रोखले. रुमेली धर आणि शिखा पांडे या वेगवान गोलंदाजांनी आफ्रिकेची ३ बाद २० अशी अवस्था केली. यातून त्यांना सावरताच आले नाही. पुढच्या फलंदाजांनी आक्रमक फटके मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावल्या. भारतीयांना ट्रेयॉनकडून धोका होता. पहिल्या सामन्यात तिने भलतीच आक्रमक फलंदाजी केली होती. आजही १७ चेंडूत २५ धावा तिने केल्या; परंतु गायकवाडच्या फसव्या चेंडूवर ती बाद झाली. त्यानंतर कापने हल्ला चढवला होता; परंतु जेमिमाचा अप्रतिम झेल दक्षिण आफ्रिकेचा खेळ खल्लास करणारा ठरला. 

संक्षिप्त धावफलक 
भारत २० षटकांत ४ बाद १६६ (मिताली राज ६२ - ५० चेंडू, ३ षटकार, स्मृती मानधना १३ -१४ चेंडू, ३ चौकार, जेमिमा रॉड्रिग्ज  ४४- ३४ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, हरमनप्रीत कौर २७ -१७ चेंडू, १ चेंडू, २ षटकार) वि.  वि. दक्षिण आफ्रिका ः १८ षटकांत सर्वबाद ११२ (ट्रेयॉन २५ -१७ चेंडू, २ षटकार, मरिझाने काप २७ -२१ चेंडू, १ चौकार, २ षटकार, शिखा पांडे ३-०-१६-३, रुमेली धर ४-०-२६-२, राजेश्वरी गायकवाड ३-०-२६-३).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news women win t-20 cricket series