esakal | लॉईडने घेतली इंग्लंडची फिरकी
sakal

बोलून बातमी शोधा

लॉईडने घेतली इंग्लंडची फिरकी

लॉईडने घेतली इंग्लंडची फिरकी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

क्वीन्सटाउन (न्यूझीलंड) - लेग स्पिनर लॉईड पोपच्या (८-३५) फिरकी गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १९ वर्षांखालील युवा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी मंगळवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडचा ३१ धावांनी पराभव केला.

ऑस्ट्रेलियाचा डाव ३३.३ षटकांत १२७ धावांत आटोपला होता. आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव २३.४ षटकांतच ९६ धावांत आटोपला. एकवेळ १ बाद ४७ अशा स्थितीत असताना इंग्लंडचे नऊ फलंदाज ४९ धावांत बाद झाले.

ऑस्ट्रेलियाच्या लॉईड पोपने ३५ धावांत ८ गडी बाद करून इंग्लंडच्या फलंदाजांना निष्प्रभ केले. लॉईडची ही कामगिरी विक्रमी ठरली. यापूर्वी जेसन राल्ट्‌सन (ऑस्ट्रेलिया, ७-१५), जीवन मेंडीस (श्रीलंका ७-१९) आणि ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड, ७-२०), राहुल विश्‍वकर्मा (६-३) यांची कामगिरी त्यांनी 
मागे टाकली.

loading image