भारत विरुद्ध पाकिस्तान उपांत्य फेरीचा मुकाबला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 January 2018

क्विन्सलॅंड - केवळ फलंदाजी-गोलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही दिमाखदार कामगिरी करणाऱ्या भारताने १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशचा १३१ धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीत धडक मारली. मंगळवारी होणाऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानशी भारताचा मुकाबला होणार आहे. 

सलामीलाच ऑस्ट्रेलियाला पाणी पाजून आपली ताकद दाखवणाऱ्या भारताला बांगलादेशविरुद्ध चांगल्या सुरवातीनंतर २६५ धावांपर्यंतच मजल मारता आली; परंतु गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणातील कमालीच्या चपळाईच्या जोरावर बांगलादेशला १३४ धावांत गुंडाळले. १० पैकी दोन फलंदाज धावचीत झाले आणि विशेष म्हणजे वेगवान गोलंदाज मावी आणि नागरकोटी यांनी हवेत सूर मारून चेंडू यष्टींच्या दिशेने मारले होते. 

संक्षिप्त धावफलक - भारत -४९.२ षटकांत सर्व बाद २६५ (पृथ्वी शॉ ४० -५४ चेंडू, ५ चौकार, शुभम गिल ८६ -९४ चेंडू, ९ चौकार, अभिषेक शर्मा ५० -४९ चेंडू, ६ चौकार, काझी ओनिक ३-४८, नईम हसन २-३६, सैफ हसन २-४१) वि. वि. बांगलादेश ः ४२.१ षटकांत सर्व बाद १३४ (पिनक घोष ४३, शिवम मावी २-२७, नागरकोटी ३-१८, अभिषक शर्मा २-११).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news worldcup cricket competition