‘स्लेजिंग’वर माझा विश्‍वास नाही - वृद्धिमान साहा

पीटीआय
Tuesday, 8 August 2017

कोलंबो - भारतीय क्रिकेट संघात यष्टिरक्षक म्हणून आता वृद्धिमान साहा आता चांगला स्थिरावला आहे. महेंद्रसिंह धोनीचा वारसदार म्हणून तो यशस्वी ठरला आहे. त्याच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे चालणाऱ्या साहाला यष्टिमागून फलंदाजांना विचलित करण्यासाठी स्लेजिंग करणे आवडत नाही. 

या संदर्भात साहा म्हणाला, ‘‘धोनीचा आदर्श ठेवूनच मी पुढे जात आहे. मी कधीही धोनीला ‘स्लेजिंग’ करताना पाहिले नाही. अन्य देशांचे यष्टिरक्षक करतात म्हणून आपणही केले पाहिजे, असे नाही. माझा स्लेजिंगवर विश्‍वास नाही. आपल्या कामगिरीने सामन्याचे चित्र पालटविण्यावर माझा अधिक विश्‍वास आहे.’’

गिलख्रिस्ट ‘हीरो’
यष्टिरक्षक म्हणून धोनी तर आदर्श आहेच; पण ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट माझा ‘हीरो’ आहे, असे सांगून साहा म्हणाला,‘‘लहानपणापासून मला गिलख्रिस्टच्या यष्टिरक्षणाने भुरळ पाडली आहे. त्याची फलंदाजी आणि यष्टिरक्षणाची पद्धत मला खूपच भावते. माझ्या मते तो सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. मार्क बाऊचर आणि इयान हिली हेदेखील चांगले आहेत; पण माझा हीरो गिलख्रिस्टच.’’

कामगिरी दाखवण्यावर भर
मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करून सतत निवड समितीच्या ‘रडार’वर राहण्यास आपल्याला आवडते, असेदेखील साहाने सांगितले. तो म्हणाला,‘‘तू जर मैदानावर चांगली कामगिरी केलीस, तर तुझे नाव निवड समितीसमोर कायम राहील, अशी शिकवण मला माझे प्रशिक्षक जयंत बौमिक यांनी दिली आहे. त्यामुळे मी छोटीशी जरी संधी मिळाली तरी ती साधण्याचा सतत प्रयत्न करतो. स्वतःपेक्षा संघासाठी खेळण्याकडे माझा कल असतो. संघाच्या कामगिरीत माझे योगदान राहिल्यास मला अधिक आनंद होतो.’’

मालिका ३-० अशा फरकाने जिंकणार का, याचा मी विचार करत नाही. आम्ही प्रत्येक सामन्याचा स्वतंत्र विचार करतो. मालिकेत आम्ही २-० असे आघाडीवर आहोत. तिसऱ्या सामन्यातही अशीच कामगिरी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. 
- वृद्धिमान साहा, भारताचा यष्टिरक्षक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news wriddhiman Saha cricket