esakal | विजय मिळविण्याच्या इराद्यानेच उतरणार - साहा
sakal

बोलून बातमी शोधा

विजय मिळविण्याच्या इराद्यानेच उतरणार - साहा

विजय मिळविण्याच्या इराद्यानेच उतरणार - साहा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर - भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धची मालिका आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे असले, तरी त्या दौऱ्याबद्दल आम्ही अद्याप विचार केलेला नाही. सध्या आमचा संपूर्ण ‘फोकस’ नागपूर कसोटीवर असून, यात विजय मिळविण्याच्या इराद्यानेच आम्ही मैदानात उतरणार असल्याचे भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने सांगितले. 

ईडन गार्डन्सवरील पहिल्या कसोटी सामन्यात आलेल्या चढ-उताराच्या परिस्थितीनंतरही आम्ही विजयाची संधी निर्माण केली होती, असे सांगताना साहा याने भारतीय मध्यमगती गोलंदाजांच्या यशाबद्दल जोरदार ‘बॅटिंग’ केली. साहा म्हणाला, ‘‘पहिल्या डावात फलंदाज अपयशी ठरल्यानंतर वेगवान गोलंदाजांनी आम्हाला विजयाची संधी मिळवून दिली होती. त्यांनी खऱ्या अर्थाने भारताला सामन्यात आणले होते. मात्र पुरेशा वेळेअभावी आम्ही सामना जिंकू शकलो नाही. ७०-८० धावांमध्ये आठ फलंदाज माघारी पाठविल्यानंतर आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी कसोशीने प्रयत्न केला. दुर्दैवाने अंधूक प्रकाशामुळे आमच्या आशेवर पाणी फेरले गेले. गोलंदजांच्या कामगिरीमुळे आमचा आत्मविश्‍वास वाढला असून, हाच आत्मविश्‍वासाच्या जोरावर आम्ही दुसऱ्या कसोटीत मैदानावर उतरू.’’

फलंदाजीची क्रमवारी कशी असावी, याबाबत संघ व्यवस्थापनच निर्णय घेते. परिस्थितीनुसार कुणाला कुठल्या क्रमांकावर पाठवायचे हे ठरत असते. त्यामुळे मी कधी सहाव्या, तर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. अर्थात, क्रमवारीला महत्त्व नाही.
-वृद्धिमान साहा, भारताचा यष्टिरक्षक

loading image
go to top