esakal | वन-डे संघातून युवराज बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

वन-डे संघातून युवराज बाहेर

वन-डे संघातून युवराज बाहेर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या लढतीसाठी निवडलेल्या भारतीय संघातून युवराज सिंगला वगळण्यात आले आहे, त्याचवेळी या संघात शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर अपेक्षेनुसार रवींद्र जडेजा आणि आर. अश्‍विनला ब्रेक देण्यात आला आहे. सुरेश रैनालाही पुनरागमनाची संधी देण्यात आली नाही. २०१९ च्या विश्‍वकरंडक स्पर्धेवर नजर ठेवून संघनिवड करण्यास आता सुरवात झाली आहे, असेच मानले जात आहे. भारतीय संघ श्रीलंकेत पाच एकदिवसीय लढती आणि एक ट्‌वेंटी-२० खेळणार आहे. 

भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मनीष पांडे, अजिंक्‍य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, भुवनेश्‍वर कुमार, शार्दुल ठाकूर.

loading image