भारताविरुद्धच्या वर्ल्डकप सामन्यात स्पॉट फिक्‍सिंगची ऑफर होती - अकमल 

वृत्तसंस्था
Tuesday, 26 June 2018

ऑस्ट्रेलियात 2015 मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात स्पॉट फिक्‍सिंग करण्याची आपल्याला ऑफर देण्यात आली होती, अस गौप्यस्पोट पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमलने केला, परंतु त्याच वेळी हा प्रकार का उघडकीस केला नाही, याची विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस पाक मंडळाने अकलमला पाठवली आहे.

कराची - ऑस्ट्रेलियात 2015 मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात स्पॉट फिक्‍सिंग करण्याची आपल्याला ऑफर देण्यात आली होती, अस गौप्यस्पोट पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमलने केला, परंतु त्याच वेळी हा प्रकार का उघडकीस केला नाही, याची विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस पाक मंडळाने अकलमला पाठवली आहे. 

ऍडलेड येथे झालेला तो सामना भारताने 76 धावांनी जिंकला होता. विराट कोहलीने 107 धावांची खेळी केली होती. फलंदाजी करताना चेंडू न खेळताच सोडून देण्याचे स्पॉट फिक्‍सिंग करण्यासाठी आपल्याला 2 लाख डॉलर देण्याची ती ऑफर होती, असे उमर अकलनने सामा टीव्हीशी बोलताना सांगितले. 

माझ्यासाठी हे नवे नव्हते अशा प्रकारच्या अनेक ऑफर अनेकदा आलेल्या होत्या, असेही खळबळजनक विधान अकमलने केले आहे. तो पुढे म्हणतो. प्रामुख्याने भारताविरुद्धच्या सामन्यात अशा ऑफर आलेल्या होत्या. "तू खेळू नको. सामन्यातून माघार घे, असे मला सांगण्यात येत असे, मी पाक क्रिकेटशी बांधिल आहे त्यामुळे असे कृत्य मी करणार नाही, असे मी त्यांना ठामपणे सांगत असे, असेही स्पष्टीकरण अकमलने दिले आहे. 

अकमलच्या या माहितीची दखल घेत पाक मंडळाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला नोटीस पाठवली असून, 27 जूनला आयोगामोर चौकशीसाठी बोलवले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spot fixing was offered in the World Cup match against India says Akmal