esakal | स्मिथच्या शतकामुळे कांगारूंची पकड
sakal

बोलून बातमी शोधा

स्मिथच्या शतकामुळे कांगारूंची पकड

स्मिथच्या शतकामुळे कांगारूंची पकड

sakal_logo
By
पीटीआय

ब्रिस्बेन - कर्णधार स्मिथच्या नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या ॲशेस कसोटीत इंग्लंडवरील दडपण आणखी वाढवत पकड घेतली. २६ धावांची वरकरणी अल्प; पण मानसिकदृष्ट्या बहुमोल ठरणारी आघाडी घेतल्यानंतर त्यांनी इंग्लंडची २ बाद ३३ अशी दुरवस्था केली. ४ बाद १६५ वरून कांगारूंनी ३२८ धावांपर्यंत घोडदौड केली. इंग्लंडच्या गोलंदाजांना कांगारूंच्या शेपटाने भंडावून सोडले. यात कमिन्सचा वाटा महत्त्वाचा होता.

उपाहारास कांगारूंची ७ बाद २१३ अशी दुरवस्था होती. पहिल्या सत्रात त्यांना तीन विकेट गमावून केवळ ४८ धावांची भर घालता आली. यात स्मिथने ६४ वरून ८१ पर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या सत्रात मात्र कांगारूंनी पारडे फिरविले. आठव्या विकेटसाठी स्मिथ-कमिन्स यांनी ६९ धावांची भर घातली. 

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ३०२ व १६ षटकांत २ बाद ३३ (कुक ७, व्हिन्स २, मार्क स्टोनमन खेळत आहे १९, ज्यो रूट खेळत आहे ५, हेझलवूड २-११) वि. ऑस्ट्रेलिया ः १३०.३ षटकांत सर्वबाद ३२८ (स्टीव स्मिथ नाबाद १४१-५२१ मिनिटे,  ३२६ चेंडू, १४ चौकार, शॉन मार्श ५१, पॅट कमिन्स ४२-१३० मिनिटे, १२० चेंडू, ५ चौकार, १ षटकार, हेझलवूड ६-२५ चेंडू, लायन ९-२२ चेंडू, जेम्स अँडरसन २-५०, स्टुअर्ट ब्रॉड ३-४९, मोईन अली २-७४)

loading image