श्रीलंका कर्णधारासह प्रशिक्षकावर बंदी

वृत्तसंस्था
Tuesday, 17 July 2018

काय करण्यात आली कारवाई? 
-चंडिमल, हाथुरासिंघे, गुरुसिंघा यांना प्रत्येकी आठ दोषांक 
-आठ दोषांक म्हणजे दोन कसोटी आणि चार एकदिवसीय किंवा टी 20 सामन्यासाठी निलंबन, किंवा आठ एकदिवसीय सामन्यांसाठी निलंबन, या पैकी जे आधी खेळले जाईल 
-या खेरीज तिघांना शिस्तभंगाबाबत प्रत्येकी सहा दोषांक 
-हाथुरासिंघे आणि गुरुसिंघा यांचा पहिलाच गुन्हा, चंडिमलची गुन्ह्याची दुसरी वेळ 
-चंडिमलला यासाठी आणखी चार दोषांक, चंडिमलच्या नावावर आता 10 दोषांक 

दुबई- खेळभावनेविरुद्ध वर्तन केल्याच्या आरोपप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंका कर्णदार दिनेश चंडिमल, प्रशिक्षक चंडिका हाथुरासिंगे आणि संघ व्यवस्थापक असांका गुरुसिंघे यांच्यावर चार एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी घेतला. 

या कारवाईमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणाऱ्या श्रीलंका संघाला दोन्ही कसोटींत या तिघांशिवाय उतरावे लागणार आहे. त्याचबरोबर पाच एकदिवसीय सामन्यांपैकी पहिल्या चार सामन्यात ते खेळू शकणार नाहीत. 

चेंडू कुरतडण्याप्रकरणी आयसीसीने केलेली ही दुसरी कारवाई ठरली. गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चेंडू कुरतडण्याचे आरोप श्रीलंका खेळाडूंवर झाले होते. त्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी दुसऱ्या दिवशी मैदानात उतरण्यास नकार दिला होता. त्याचबरोबर दुसऱ्या चेंडूने खेळण्यासही श्रीलंकेने नकार दिला होता. श्रीलंका खेळाडूंची ही सगळी कृती खेळभावनेस तडा देणारी होती, असे आयसीसीने कारवाई करताना स्पष्ट केले आहे. 

या प्रकरणी या तिघांवर आयसीसीच्या आचारसंहिताच्या लेव्हल 3 (2.3.1) नियमाचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. आयसीसीच्या आचारसंहिता समितीने 11 जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या प्रकरणाची चौकशी केली होती. तब्बल सहा तास चौकशी झाल्यानंतर समितीने निर्णय राखून ठेवला होता. 
 
काय करण्यात आली कारवाई? 
-चंडिमल, हाथुरासिंघे, गुरुसिंघा यांना प्रत्येकी आठ दोषांक 
-आठ दोषांक म्हणजे दोन कसोटी आणि चार एकदिवसीय किंवा टी 20 सामन्यासाठी निलंबन, किंवा आठ एकदिवसीय सामन्यांसाठी निलंबन, या पैकी जे आधी खेळले जाईल 
-या खेरीज तिघांना शिस्तभंगाबाबत प्रत्येकी सहा दोषांक 
-हाथुरासिंघे आणि गुरुसिंघा यांचा पहिलाच गुन्हा, चंडिमलची गुन्ह्याची दुसरी वेळ 
-चंडिमलला यासाठी आणखी चार दोषांक, चंडिमलच्या नावावर आता 10 दोषांक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sri Lanka captain Dinesh Chandimal and coach banned