पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा कांगारूंवर विजय 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

मेलबर्न : नव्या दमाच्या श्रीलंका संघाने तेवढ्याच नव्या खेळाडूंच्या ऑस्ट्रेलियावर पहिल्या टी-20 सामन्यात पाच गडी राखून विजय मिळविला. 

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 6 बाद 168 धावांची मजल मारली होती. श्रीलंकेने 20 षटकांत 5 बाद 172 धावा केल्या. 

मेलबर्न : नव्या दमाच्या श्रीलंका संघाने तेवढ्याच नव्या खेळाडूंच्या ऑस्ट्रेलियावर पहिल्या टी-20 सामन्यात पाच गडी राखून विजय मिळविला. 

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 6 बाद 168 धावांची मजल मारली होती. श्रीलंकेने 20 षटकांत 5 बाद 172 धावा केल्या. 

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने कर्णधार उपुल थरंगाची विकेट पहिल्याच षटकात गमावली. पण त्यानंतर निरोशान डिकवेला (30) आणि दिल्शान मुनाविरा (44) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. त्यानंतर असिका गुणरत्ने याने 37 चेंडूंत 7 चौकारांसह 52 धावांची निर्णायक खेळी केली. अठराव्या षटकात दोन चेंडूंच्या अंतराने श्रीलंकेने दोन गडी गमावले. पण कापुगेदरा आणि सीकुगे प्रसन्ना यांनी श्रीलंकेचा विजय साकार केला. 

त्यापूर्वी ऍरॉन फिंच (43), वयाच्या 38 व्या वर्षी पदार्पण करणारा मायकेल क्‍लिंगर (38), ट्राविस हेड (31) या आघाडीच्या तीन फलंदाजांच्या कामगिरीने ऑस्ट्रेलियाचे आव्हान उभे राहू शकले होते. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या लसित मलिंगाच्या गोलंदाजीचा श्रीलंकेला आधार मिळाला. त्याने 29 धावांत 2 गडी बाद केले. 

संक्षिप्त धावफलक : 
ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 6 बाद 168 (ऍरॉन फिंच 43, मायकेल क्‍लिंगर 38, ट्राविस हेड 31, लसिथ मलिंग 2-29) पराभूत वि. श्रीलंका 20 षटकांत 5 बाद 172 (असिका गुणरत्ने 52, दिल्शान मुनाविरा 44, निरोशान डिकवेला 30, ऍडम झम्पा 2-26, ऍश्‍टन टर्नर 2-12). 

 

Web Title: Sri Lanka versus Australia Upul Tharanga Lasith Malinga