दिल्ली कसोटीत प्रदूषणामुळे व्यत्यय; खेळाडू 'मास्क' लावून

Sunday, 3 December 2017

गमागे आणि लकमल मैदानातून बाहेर गेले. श्रीलंकन संघाने योजलेल्या नीतीचा फायदा झाला कारण अश्‍विन पाठोपाठ विराट कोहलीला बाद करण्यात श्रीलंकन गोलंदाजांना यश आले.

नवी दिल्ली - दिल्ली कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपहारानंतर मोठे नाट्य मैदानावर घडले. उपहारानंतर अचानक 5-6 श्रीलंकन खेळाडू तोंडाला मास्क लावून मैदानात उतरले. अन् पंचांना काहीकाळ खेळ थांबवावा लागला. मात्र, काही वेळानंतर सामना पुन्हा सुरु झाला अन भारताने 536 धावांवर डाव घोषित केला.

लंचनंतर विराट कोहलीने गोलंदाजांचा समाचार घेणे परत चालू केल्यावर वेगवान गोलंदाज गमागे अचानक ओव्हर संपल्यावर खोकायला लागला. कर्णधार दिनेश चंडीमलने पंचांकडे तक्रार केली की श्रीलंकन खेळाडूंना दिल्लीच्या प्रदूषणाने श्‍वास घ्यायला त्रास होत आहे. 17 मिनिटे खेळ थांबला होता. सामना अधिकारी डेव्हीड बुन यांनी खेळ चालू ठेवायची सल्ला दिल्यावर मैदानावरील पंचांनी श्रीलंकन खेळाडूंना खेळायची आग्रही सूचना दिली. खेळ चालू झाल्यावर पहिल्याच चेंडूवर गमागेला अश्‍विनची विकेट मिळाली. तेव्हा गमागेने आनंद व्यक्त केला पण लगेच हात छातीकडे नेऊन त्रास होत असल्याचा अभिनय केला. तेव्हा कॉमेंटेटर्स आणि पत्रकार कक्षात एकच हशा पिकला. 

गमागे आणि लकमल मैदानातून बाहेर गेले. श्रीलंकन संघाने योजलेल्या नीतीचा फायदा झाला कारण अश्‍विन पाठोपाठ विराट कोहलीला बाद करण्यात श्रीलंकन गोलंदाजांना यश आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sri Lankan players struggle due to Delhi pollution; wear face masks at Feroz Shah Kotla