द. आफ्रिका- श्रीलंका पहिली कसोटी आजपासून

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

पोर्ट एलिझाबेथ : दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेच्या फिरकीचे आव्हान मोडून काढण्यासाठी उद्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या सेंट जॉर्ज पार्कची खेळपट्टी हिरवीगार बनवली आहे. अर्थात, दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने खेळपट्टीवर नेहमीइतकेच गवत आहे. आमची ताकद वेगवान गोलंदाजीतच असल्यामुळे आमची मदार त्यांच्यावर असेल, असे स्पष्ट केले.

चार वर्षांपूर्वी डर्बन कसोटीत श्रीलंकेने फिरकी गोलंदाज रंगना हेराथच्या कामगिरीने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळविला होता. त्या फिरकीचीच धास्ती यजमानांना असल्याचे वाटते.

प्लेसिस म्हणाला, "खेळपट्टी कोरडी आहे. वेगवान गोलंदाजांना जरूर साथ मिळेल; पण कालांतराने चेंडू फिरूसुद्धा शकतो. आजही त्यांच्याकडे चांगले फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना कमी लेखणार नाही.'' श्रीलंका संघाचा कर्णधार एंजेलो मॅथ्यूज यानेदेखील नवोदित खेळाडू आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.

Web Title: srilanka vs south africa test match