..आता कोहलीशी मैदानावर जास्त बोलतो: धोनी

पीटीआय
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016

धरमशाला: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या नेतृत्वाच्या पातळीवर स्थित्यंतराची प्रक्रिया सुरू आहे आणि एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही या प्रक्रियेला अनुकूल अशी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर या संघाची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर आली. एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 क्रिकेटमध्ये धोनीच कर्णधार असला, तरीही कोहलीकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नजीकच्या भविष्यातील स्थित्यंतर पाहता 'मी आतापासूनच मैदानावरील निर्णयांमध्ये कोहलीला अधिकाधिक सहभागी करून घेऊ लागलो आहे,' असे धोनीने आज (शनिवार) स्पष्ट केले.

धरमशाला येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना उद्या (रविवार) होणार आहे. यासंदर्भात धोनीची आज पत्रकार परिषद झाली. धोनी म्हणाला, "तुम्ही सामना बारकाईने पाहिला, तर लक्षात येईल की आता मैदानावर कोहलीशी मी जास्त चर्चा करू लागलो आहे. एखाद्या निर्णयासंदर्भात त्याची मतेही मी जाणून घेत आहे. अर्थात, वरिष्ठ खेळाडू म्हणून संघातील तुमची जबाबदारी वाढलेली असते. मग तुम्ही उपकर्णधार असा किंवा कर्णधार किंवा खेळाडू.. वरिष्ठ खेळाडू म्हणून नेहमीच एक अतिरिक्त जबाबदारी असतेच. संघातील नव्या खेळाडूंशी चर्चा करून त्यांना आवश्‍यक तिथे मार्गदर्शनही करायचे असते.''

2004 मध्ये कसोटीत पदार्पण केल्यानंतर धोनीने गेल्या वर्षी निवृत्ती घेतली. याविषयी तो म्हणाला, "माझ्या पदार्पणापासून आतापर्यंत क्रिकेटचे चित्र खूपच बदलले आहे. आता संघात नवोदित खेळाडू ज्या तयारीने आणि आत्मविश्‍वासाने येत आहेत, ते पाहून आश्‍चर्य वाटते. माझी संघातील भूमिका तीच आहे; पण काळानुसार जबाबदारी वाढली आहे.''

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताने काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागी नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे या मालिकेमध्ये धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीस येऊ शकतो. याचे संकेतही त्याने पत्रकार परिषदेत दिले. वरिष्ठ गोलंदाजांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची गोलंदाजीची धुरा उमेश यादव आणि जसप्रित बुमराह यांच्या खांद्यावर आहे.

भारतीय संघामध्ये संधी मिळणे खूपच अवघड आहे. त्यामुळे नियमित खेळाडूंना विश्रांती देताना संधी मिळालेल्या नवोदितांनी याच संधीचे सोने करणे अपेक्षित आहे. भारतीय संघाने सामने जिंकणेही आवश्‍यक आहे आणि नवोदितांना तयार करण्याची प्रक्रियाही महत्त्वाची आहे. या दोन्ही गोष्टींचा तोल सांभाळण्याची कसरत करावीच लागते.
- महेंद्रसिंह धोनी, भारतीय संघाचा कर्णधार

Web Title: Started using Kohli's brain more often now, says MS Dhoni