राज्य संघटनांची "बीसीसीआय'कडे विशेष सभेची मागणी 

वृत्तसंस्था
Friday, 1 June 2018

प्रशासक समितीच्या भूमिकेमुळे त्रस्त झालेल्या 13 राज्य क्रिकेट संघटनांनी "बीसीसीआय'कडे 22 जून रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली - प्रशासक समितीच्या भूमिकेमुळे त्रस्त झालेल्या 13 राज्य क्रिकेट संघटनांनी "बीसीसीआय'कडे 22 जून रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याची मागणी केली आहे. यामध्ये आयसीसीबरोबर असलेला महसूलवाटप, व्यावसायिक करारातून मिळणाऱ्या उत्पन्नाची स्थिती आणि क्रिकेटपटू करार अशा प्रमुख विषयांवर चर्चा व्हावी, असे या संघटनांचे म्हणणे आहे. याला "बीसीसीआय'कडून अजून काही उत्तर देण्यात आलेले नाही.

अगदीच "बीसीसीआय'ने ही सभा घेण्याचा निर्णय घेतल्यास ती सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी होईल. न्यायालयीन सुनावणी 5 जुलै रोजी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Organizations demands to BCCI for special meeting