esakal | चेंडू कुरतडणे प्रकरणानंतर 4 दिवस रडत होता स्मिथ
sakal

बोलून बातमी शोधा

Steve Smith

या शिक्षेच्या काळात स्मिथने सिडनीतील एका शाळेत पुरुषांचे मानसिक आरोग्य (मेन्स मेंटल हेल्थ चॅरिटी) या संस्थेच्या प्रमोशनसाठी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सेव्हन नेटवर्कच्या ऑडिओ रेकॉर्डनुसार स्मिथ विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगू तर या प्रकरणामुळे मी जवळजवळ चार दिवस अश्रु ढाळले. मी खरोखरच मानसिकरित्या स्वतःशी लढत आहे. ही माझ्यासाठी नक्कीच सर्वात कठीण गोष्ट आहे."

चेंडू कुरतडणे प्रकरणानंतर 4 दिवस रडत होता स्मिथ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सिडनी : दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यादरम्यान चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ या प्रकरणानंतर चार दिवस रडत असल्याचे समोर आले आहे. त्याला त्याच्या मुलांनी भावना आवरण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे.  

चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात स्मिथ याच्यासह सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांना एक वर्षांची बंदीची शिक्षा देण्यात आली होती. या दोघांना आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याच्या बातम्या माध्यमांतून फिरत होत्या. आता या प्रकरणानंतर तब्बल चार दिवस स्मिथ सतत रडत होता, हा खुलासा खुद्द स्मिथने केला आहे. या अपमानास्पद प्रकरणात दोषी ठरल्यानंतर मायदेशी सिडनीला परतताना पत्रकार परिषदेत तो म्हणाला, "भावनिकदृष्ट्या व्यक्त होण्यास काहीच हरकत नसते."

या शिक्षेच्या काळात स्मिथने सिडनीतील एका शाळेत पुरुषांचे मानसिक आरोग्य (मेन्स मेंटल हेल्थ चॅरिटी) या संस्थेच्या प्रमोशनसाठी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सेव्हन नेटवर्कच्या ऑडिओ रेकॉर्डनुसार स्मिथ विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगू तर या प्रकरणामुळे मी जवळजवळ चार दिवस अश्रु ढाळले. मी खरोखरच मानसिकरित्या स्वतःशी लढत आहे. ही माझ्यासाठी नक्कीच सर्वात कठीण गोष्ट आहे."

या कार्यक्रमाच्या सुरवातीला स्मिथला सिडनीतील लोकांच्या संतापजनक टीकांना सामोरे जावे लागले. परंतु पत्रकार परिषदेत तो त्याच्या वडिलांच्या आठवणीने भावूक झाला. त्यामुळे त्याला लोकांचे सांत्वन मिळाल्याने सहानुभूतीची लाट निर्माण झाली. स्मिथने सांगितले, की कठीण प्रसंगातही आधार देणारे कुटुंब आणि जिवलग मित्र मिळाल्यामुळे तो स्वतःला भाग्यवान समजतो. एक पुरुष म्हणून भावना व्यक्त करण्यात कसलाच कमीपणा नसतो.

राज्य आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी केली असली तरी स्मिथला ऑस्ट्रेलियातील क्लब पातळीवर आणि परदेशी देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी आहे. 28 जून ते 15 जुलै दरम्यान टोरंटोत होणाऱ्या ग्लोबल टी 20 कॅनडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी तो पुन्हा खेळण्यास सज्ज होणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

याबाबत स्मिथ म्हणाला, "आशा करतो की, जेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुररागमन करेल तेव्हा मी नव्या दमाने खेळण्यास तयार असेल." स्मिथबरोबर वॉर्नरदेखील कॅनडा स्पर्धेत खेळणार आहे. तर बॅनक्रॉफ्ट जुलैमध्ये डार्विन येथे कमी पातळीवरच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.

loading image