स्मिथ-मॅक्‍सवेलचा धडाका; भारतीय गोलंदाज निष्प्रभ 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मार्च 2017

धावफलक : 
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : 7 बाद 401 (दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत) 
स्टीव्ह स्मिथ खेळत आहे 153, ग्लेन मॅक्‍सवेल 104, मॅट रेनशॉ 44, मॅथ्यू वेड 37 
रवींद्र जडेजा 4-106, उमेश यादव 2-94, आर. आश्‍विन 1-94

रांची : कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्‍सवेलच्या शतकी धडाक्‍यामुळे तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने वर्चस्व मिळविले आहे. रवींद्र जडेजाने तीन गडी बाद करत भारताचे आव्हान कायम राखले आहे. दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून 401 धावा केल्या होत्या. स्मिथ अद्याप 153 खेळत आहे. 

स्मिथ-मॅक्‍सवेलने भारतीय गोलंदाजांवर पूर्ण वर्चस्व गाजविले. कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे मैदानावर नसल्याचा फटका भारताला बसला. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्‍य रहाणेने आक्रमक क्षेत्ररचना लावत ऑस्ट्रेलियावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला गोलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाने वेगाने धावा केल्या. जडेजाचा अपवाद वगळता इतर गोलंदाजांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. 

स्मिथ-मॅक्‍सवेलच्या धडाक्‍यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया धावांचा डोंगर उभा करेल, अशी चिन्हे दिसत होती. यादरम्यान मॅक्‍सवेलने कसोटीतील पहिले शतक झळकाविले. यानंतर लगेचच तो जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्या जागी मैदानावर आलेल्या मॅथ्यू वेडनेही आल्यापासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. उपाहारापूर्वी काही मिनिटांमध्ये वेड आणि पॅट कमिन्स या दोघांना जडेजाने बाद केले. 

धावफलक : 
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : 7 बाद 401 (दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत) 
स्टीव्ह स्मिथ खेळत आहे 153, ग्लेन मॅक्‍सवेल 104, मॅट रेनशॉ 44, मॅथ्यू वेड 37 
रवींद्र जडेजा 4-106, उमेश यादव 2-94, आर. आश्‍विन 1-94

Web Title: Steve Smith Glenn Maxwell India versus Australia Virat Kohli