कोहलीच बेस्ट! : स्टीव्ह वॉ

पीटीआय
Friday, 10 August 2018

मेलबर्न : 'सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वोत्तम कौशल्य विराट कोहलीकडेच आहे', अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी भारतीय कर्णधाराचे तोंडभरून कौतुक केले. 'खडूस' या विशेषणाने परिचित असलेल्या वॉ यांनी सहसा कुणाचेही कौतुक केलेले नाही. पण कोहलीचा उल्लेख मात्र त्यांनी 'बिग ऑकेजन प्लेअर' असा केला. 

'क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू' या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोहलीचे कौतुक केले. त्यात त्यांनी कोहलीची तुलना ब्रायन लारा आणि सर व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली. 'जगातील सर्वोत्तम फलंदाज होण्याचे सर्व गुण कोहलीमध्ये आहेत', असे वॉ यांनी म्हटले आहे. 

'जगातील कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही खेळपट्टीवर कोहली चांगली कामगिरी करू शकतो. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम तंत्र असलेला हा फलंदाज आहे. असे बिनचूक तंत्र सध्या दोनच खेळाडूंकडे आहे. एबी डिव्हिलिअर्स आणि कोहली! पण डिव्हिलिअर्सने आता निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे कोहली हाच सर्वोत्तम फलंदाज ठरतो. खडतर परिस्थिती असताना, मोक्‍याच्या क्षणी खेळ उंचावण्याची त्याची क्षमता आहे. अशा क्षमतेमध्ये त्याची तुलना लारा, सचिन तेंडुलकर, जावेद मियांदाद आणि रिचर्डस यांच्याशीच होऊ शकते', असे वॉ म्हणाले. 

आतापर्यंत 67 कसोटींमध्ये कोहलीने 54.28 च्या सरासरीने 5754 धावा केल्या आहेत. याशिवाय, 211 एकदिवसीय सामन्यांमध्ये 58.2 च्या सरासरीने 9779 आणि 62 ट्‌वेंटी-20 सामन्यांमध्ये 48.8 च्या सरासरीने 2102 धावा केल्या आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोहलीने 149 आणि 51 धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे कसोटीमधील फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने अव्वल स्थानी झेप घेतली. सचिन तेंडुलकरनंतर कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकाविणारा कोहली हा भारताचा पहिलाच फलंदाज आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steve Waugh praises Virat Kohli