स्टुअर्ट ब्रॉड म्हणतो...स्मिथ, कोहलीपेक्षा रूट सर्वक्षेष्ठ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

लंडन - सध्याच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज कोण, या वादात आता भारतातील पराभव जिव्हारी लागलेल्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने उडी घेतली आहे. भारताचा विराट कोहली किंवा ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ यांच्यापेक्षा इंग्लंडचा ज्यो रूट सर्वश्रेष्ठ फलंदाज असल्याचे म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाने कालच जाहीर केलेल्या त्यांच्या सर्वोत्तम एकदिवसीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे देऊन त्याच्या लौकिकाचा आणि क्षमतेचा गौरव केला होता; पण भारतातील कसोटी मालिकेत उडालेली धुळधाण ब्रॉडच्या जिव्हारी लागल्याचे त्याच्या कोतेपणावरून स्पष्ट झाले.

कोहली किंवा स्मिथ यांच्यापेक्षा रूट कसा महान आहे, याची मखलाशी करताना ब्रॉड म्हणतो, की रूटसह मी अधिक क्रिकेट खेळलो आहे त्यामुळे मी त्याचा खेळ जवळून पाहिला आहे आणि त्याची क्षमताही जाणली आहे. तो सर्व प्रकारच्या वातावरणात धावा करू शकतो; तसेच त्याच्याकडे मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे.

रूटला सध्याच्या क्रिकेटमधील सर्वक्षेष्ठ असे लेबल लावल्यानंतर ब्रॉडने स्मिथला कोहलीपेक्षा वरचे स्थान दिले. रूट आणि स्मिथसारखे फलंदाज जेव्हा फलंदाजीस उतरतात, तेव्हा ते सातत्य दाखवत असतात. धावा करण्याची त्यांची भूक कायम असते, त्यामुळे त्यांच्याकडून सातत्याने चांगली कामगिरी होत राहते.

विराट कोहलीच्या उजव्या यष्टीबाहेरील कमकुतपणावर ब्रॉडने बोट ठेवले. तो म्हणतो, की कोहलीला उजव्या यष्टीबाहेर चेंडू टाकत राहिल्यावर त्याला बाद करण्याची संधी कायम असते. त्याच्या बॅटची कडा कोणत्याही क्षणी लागू शकते. मात्र पायामध्ये ते अतिशय सक्षम आहे त्यामुळे तो फारसा त्रिफळाचीत होत नाही. धावा करण्याची त्याची भूकही अफलातून आहे.

Web Title: stuart broad talking