कोलकता-बंगळूर सामन्यातून रंगतदार संघर्षाची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

हैदराबाद संघाकडून झालेल्या मोठ्या पराभवाच्या धक्‍क्‍यातून कोलकता संघ कसा सावरतो हे पाहाणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. दिल्लीचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरने जबरदस्त फलंदाजी करून दिनेश कार्तिकच्या संघाकडून सामना हिरावून नेला. आवश्‍यक धावांसमोर त्यांना अपेक्षित सुरवात मिळाली नाही. ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज आखूड टप्प्याच्या चेंडूसमोर बाद होत गेले. आता कोलकताचा सामना बंगळूरविरुद्ध होत आहे, त्यामुळे बंगळूरही आखूड टप्प्यांच्या चेंडूंची व्यूहरचना करण्याची शक्‍यता आहे.

बॅटच्या टप्प्यात आलेले चेंडू भिरकावून देण्याची सुनील नारायणची खासियत आहे. कालच्या सामन्यात त्याने असे काही फटकेही मारले; परंतु कंठाच्या दिशेने आलेल्या चेंडूवर तो गडबडतो. उथप्पाला मात्र आखूड टप्प्याचे चेंडू आवडतात, कोलकता संघातून खेळत असला तरी तो मूळचा कर्नाटकचा खेळाडू आहे आणि घरच्या प्रेक्षकांसमोर चमकदार खेळी करण्यास उत्सुक असेल. उथप्पा आणि ख्रिस लीन हे कोलकता संघासाठी महत्त्वाचे खेळाडू असतील. मैदानाच्या सभोवार टोलेजंग षटकार मारण्याची क्षमता आंद्रे रसेलमध्ये आहे. शुभमन गिलनेही कालच्या सामन्यात चांगली चमक दाखवली, त्यामुळे त्याला बढती मिळू शकते.

बंगळूरसाठी आतापर्यंतचा प्रवास चढ-उतार असाच राहिला आहे. त्यांची भरभक्कम फलंदाजी पाहता कोणतेही आव्हान त्यांच्यासाठी कठीण नसेल, अडचण मात्र सातत्याची आहे. डिव्हिल्यर्स स्वप्नवत अशी टोलेबाजी करत आहे. प्रेक्षकांसह समोरच्या संघालाही तो मंत्रमुग्ध करतो. मात्र अंतिम टप्प्यातील त्यांची गोलंदाजी हा सर्वात मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. फॉर्मात असलेल्या धोनीसमोर अँडरसनला अखेरच्या षटकात गोलंदाजी देणे चुकीचे होते. दोन्ही संघ पुन्हा विजयाच्या मार्गावर येण्यासाठी प्रयत्नशील असतील. दोन्ही संघांत प्रथितयश खेळाडू आहेत, त्यामुळे हा सामना रंगतदार होऊ शकतो.

Web Title: sunil gavaskar cricket