प्रगतिशील बुमराकडून नोबॉल पडणे अनपेक्षित

सुनील गावसकर
गुरुवार, 12 एप्रिल 2018

गतविजेत्या मुंबई इंडियन्सला सलामीच्या सामन्यातील पराभवानंतर आढावा घेण्यासाठी काही दिवसांचा अवधी मिळाला. वानखेडेवरील तो सामना फार अटीतटीचा झाला. त्यातून धडा घेण्यासारखे फार काही नसते. याचे कारण ड्‌वेन ब्राव्हो याच्यासारखा फलंदाज अविश्‍वसनीय खेळी करतो. किंवा एखादा गोलंदाज एक-दोन षटकांत सामन्याचे पारडे फिरवतो.

गतविजेत्या मुंबई इंडियन्सला सलामीच्या सामन्यातील पराभवानंतर आढावा घेण्यासाठी काही दिवसांचा अवधी मिळाला. वानखेडेवरील तो सामना फार अटीतटीचा झाला. त्यातून धडा घेण्यासारखे फार काही नसते. याचे कारण ड्‌वेन ब्राव्हो याच्यासारखा फलंदाज अविश्‍वसनीय खेळी करतो. किंवा एखादा गोलंदाज एक-दोन षटकांत सामन्याचे पारडे फिरवतो.

मुंबईला एक खबरदारी घेता येईल. फलंदाजीची क्षमता पाहता किमान द्विशतकी धावसंख्या त्यांना उभारता आली पाहिजे. मग त्यांचे गोलंदाज प्रतिस्पर्ध्याला रोखण्याचा प्रयत्न करू शकतील. पहिल्या सामन्यात त्यांचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमरा याच्यावर ब्राव्होने आक्रमण केले. तसे सर्वोत्तम गोलंदाजांच्या बाबतीत होऊ शकते आणि होतेच. बुमराला एका गोष्टीसाठी मेहनत घ्यावी लागेल आणि ती म्हणजे नोबॉल टाळणे. कसोटी सामन्यात तसे होणे समजू शकते. याचे कारण तेव्हा कसून प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात काही वेळा वेगवान गोलंदाजांचा पाय चुकून पॉपिंग क्रीझच्या बाहेर पडतो. काही वेळा ठणठणीत खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज क्रीझमध्ये पुढे जाऊन फलंदाजाला चकविण्याचा प्रयत्न करतात. झटपट क्रिकेटमध्ये फलंदाजाला चेंडूच्या वेगाचा फायदा मिळू न देणे महत्त्वाचे असते. साहजिकच वेगवान गोलंदाजांनी बॅटींग क्रीझच्या मागून चेंडू टाकणे महत्त्वाचे असते.

नोबॉलमुळे एक जादा धाव जातेच आणि शिवाय ‘फ्री-हीट’ सुद्धा द्यावी लागते. त्यामुळे सामन्याचे पारडे फिरू शकते. बुमराने वेगाने सुधारणा करण्याची क्षमता प्रदर्शित केली आहे. झटपट क्रिकेट ते कसोटी क्रिकेटपर्यंतची त्याची वाटचाल अप्रतिम आहे. त्यामुळेच ‘स्टेपिंग’ चुकून त्याच्याकडून नोबॉल पडणे अनपेक्षित ठरले आहे.

असे नेहमी घडत नाही, पण झटपट क्रिकेटमध्ये असे अजिबात घडता कामा नये. त्यासाठी गोलंदाजाने ‘फ्रंट फूट’ नेहमी ‘पॉपिंग क्रीझ’च्या मागेच पडेल अशा बेताने आपला ‘रन अप’ नीट मोजणे आवश्‍यक असते. यादृष्टीने गोलंदाजीच्या सर्व प्रशिक्षकांनी कटाक्ष ठेवला पाहिजे. त्यामुळे ‘ओव्हरस्टेपिंग’ झाले तर त्याचा जाब प्रशिक्षकांना विचारला गेला पाहिजे. लेग साईडला स्वैर चेंडू पडून वाईडमुळे जादा धावा जाणे किंवा यॉर्कर चुकून कंबरेच्यावर चेंडू जाणे समजू शकते. नोबॉलच्या बाबतीत मात्र अजिबात क्षमा मिळता कामा नये, कारण आधुनिक युगात ‘रन-अप’ मोजण्यासाठी टेपचासुद्धा वापर केला जातो. 

सनरायझर्सला आपल्या गोलंदाजांकडून पहिल्या सामन्याप्रमाणेच उत्तम माऱ्याची अपेक्षा असेल. तेव्हा त्यांनी राजस्थानला स्वस्तात रोखले होते. ‘आयपीएल’मध्ये मुंबईचा प्रारंभ संथ होतो. हा संघ सर्वस्वी वेगळा प्रतिस्पर्धी ठरू शकतो.

Web Title: sunil gavaskar cricket jasprit bumrah