esakal | वगळण्याअगोदर धोनीने निवृत्त व्हावे - गावसकर
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil-and-Mahendrasinh

महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची वेळ आता आली आहे. संघातून वगळण्याअगोदर त्याने निवृत्त व्हावे, असे माजी विक्रमवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी नवोदित यष्टिरक्षकांना संधी द्यायला हवी, असे म्हणताना गावसकर यांनी रिषभ पंतला पसंती दिली आहे.

वगळण्याअगोदर धोनीने निवृत्त व्हावे - गावसकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची वेळ आता आली आहे. संघातून वगळण्याअगोदर त्याने निवृत्त व्हावे, असे माजी विक्रमवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी नवोदित यष्टिरक्षकांना संधी द्यायला हवी, असे म्हणताना गावसकर यांनी रिषभ पंतला पसंती दिली आहे.

गावसकर यांनी धोनीबाबत केलेल्या या थेट विधानावरून भारतीय क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. इंग्लंडमधील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर धोनी क्रिकेट खेळलेला नाही. काश्‍मीरमध्ये लष्करी प्रशिक्षण घेण्यासाठी त्याने वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही तो अनुपलब्ध होता.

धोनीच्या मनात आता नेमका कोणता विचार सुरू आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. भारतीय क्रिकेटमधील आपले भवितव्य काय असेल हे तोच सांगू शकतो. आता तो 38 वर्षांचा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडकापर्यंत तो 39 वर्षांचा असेल, असे गावसकर यांनी म्हटले आहे.

धोनीने याअगोदर केलेल्या धावा. यष्टिरक्षणातील चपळाई नेहमीच निर्णायक ठरलेली आहे. त्याचा अनुभव कर्णधार विराट कोहलीला मैदानावर फायदेशीर ठरलेला आहे, तरीही आता धोनीने विचार करायची वेळ आली आहे, असे गावसकर म्हणतात.

ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी रिषभ पंतला संधी द्यायला हवी, त्याचबरोबर संजू सॅमसनलाही तयार करायला हवे, असे गावसकर यांनी सुचवले आहे.

loading image
go to top