आयपीएलमधील खेळपट्ट्यांसाठी "बीसीसीआय' कौतुकास पात्र 

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

टी-20 क्रिकेट आणि त्यातही आयपीएलमधील अनिश्‍चितता वेगळीच असते. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच स्पर्धेची स्थिती बदलताना दिसते. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. बंगळूरचे आव्हान एकवेळ संपल्यात जमा असताना अचानक त्यांच्या प्ले-ऑफच्या आशा कायम राहिल्या आहेत. पंजाबविरुद्ध मिळविलेल्या विजयाने त्यांनी हे दाखवून दिले. त्यांच्या फलंदाजांनी प्रत्येक वेळी चांगली कामगिरी केली. आता त्यांचे गोलंदाजही जोशात आले आहेत. या सर्वांनी मिळून आता आपणही प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवायचे असेच जणू ठरवले असावे. 
 

मुंबई - टी-20 क्रिकेट आणि त्यातही आयपीएलमधील अनिश्‍चितता वेगळीच असते. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच स्पर्धेची स्थिती बदलताना दिसते. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. बंगळूरचे आव्हान एकवेळ संपल्यात जमा असताना अचानक त्यांच्या प्ले-ऑफच्या आशा कायम राहिल्या आहेत. पंजाबविरुद्ध मिळविलेल्या विजयाने त्यांनी हे दाखवून दिले. त्यांच्या फलंदाजांनी प्रत्येक वेळी चांगली कामगिरी केली. आता त्यांचे गोलंदाजही जोशात आले आहेत. या सर्वांनी मिळून आता आपणही प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवायचे असेच जणू ठरवले असावे. 

तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला पराभवाचीही चव चाखावी लागली. खेळपट्टीकडून मिळणाऱ्या उसळीचा त्यांचे गोलंदाज चांगला उपयोग करून घेऊ शकले नाहीत. त्यांचे गोलंदाज दिशा आणि टप्पाच हरवून बसले. त्यांच्या गोलंदाजीची हीच खरी ताकद आहे. त्यांचे क्षेत्ररक्षण जरूर उंचावले आहे, पण मधल्या फळीत त्यांच्या फलंदाजांनी धावा करण्याची गरज आहे. शिखर धवन आणि केन विल्यम्सन प्रत्येक वेळेस संघाचा डाव सावरू शकणार नाहीत. 

आयपीएलसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टी जबरदस्त होत्या. त्यासाठी "बीसीसीआय'ची पाठ थोपटायलाच हवी. खेळपट्टीवर चेंडू कधी चांगला फिरतोय, तर कधी बॅटवर सहजपणे येतोय, चेंडूला उसळीदेखील चांगली मिळतेय आणि मध्येच तो अधिक उसळी घेताना दिसतो, असे विविध प्रकार खेळपट्टीवर क्‍वचितच दिसून येतात. अर्थात टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजांना पुढे येऊन खेळायचा जणू परवानाच दिलेला असतो. यातही अनुभवी फलंदाज डावाला कधी वेग द्यायचा आणि वेगवान गोलंदाजांवर कधी हल्ला चढवायचा हे ओळखून असतो. 

सनरायझर्स हैदराबाद संघाला पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर येण्याची इच्छा असेल, पण खेळाडू आपल्या कर्णधाराशी कसे जुळवून घेतात यावर बरेच काही अवलंबून असेल. सामना जिंकण्याचाच त्यांचा प्रयत्न असेल.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunil gavaskar stroke