"टिम इंडिया'ची कामगिरी सुसज्ज सुपरकारसारखी! 

वृत्तसंस्था
Friday, 6 July 2018

पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर मिळविलेला सफाईदार विजय अत्यंत आनंददायक होता. एखादी सुसज्ज सुपर कार वेगाने जाण्याची अपेक्षा असते. अशा कारच्या इंजिनाचा वेग काही वेळाकरता कमी होतो, पण टॉप गिअर टाकताच इंजिन धडाडते आणि सुपरकार पुन्हा दिमाखात दौडू लागते. भारतीय संघाची कामगिरी अशीच होती. संघाच्या कारचे सुकाणू होते कर्णधार विराटकडे. त्याने अगदी सुस्पष्ट आणि दमदार नेतृत्व केले. आता दौरा पुढे सरकत जाईल तेव्हा संघाकडून केवळ सरस कामगिरीची अपेक्षा बाळगणे योग्य ठरेल. काही जणांकडून अपेक्षित असलेली सर्वोत्तम कामगिरी झाली नसतानाही संघ इतक्‍या सहज जिंकू शकत असेल तर मग अपेक्षा उत्तुंगच राहतील. 

इंग्लंडमध्ये बहुतेक वेळा स्वेटर घालून खेळावे लागते, पण सामन्याच्यादिवशी भारतात उन्हाळ्यात असतो तसा लख्ख सूर्यप्रकाश होता. त्यामुळे भारतीय खेळाडू आनंदाने "ऍक्‍शन'मध्ये आले. अशा हवामानाचे कदाचित इंग्लंडच्या संघाला आश्‍चर्य वाटले असेल. भारतीय पाठीराख्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करणे मात्र त्यांना अपेक्षित होते. त्यांना अपेक्षा नव्हती ती कुलदीप यादवच्या जादूची. कुलदीपने इंग्लंडच्या फलंदाजांना कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे नाचविले. त्याने टाकलेल्या चेंडूच्या "टर्न'चा अंदाज चुकल्यामुळे बेअरस्टॉ आणि ज्यो रुट पुढे सरसावले आणि अखेरीस चकले. मनगटाचा कलात्मक वापर करणाऱ्या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज कसे झगडतात हे माहीत असलेल्यांच्या चेहऱ्यावर त्यामुळे चांगलेच हसू उमटले. चहल कदाचित नवा चेंडू व्यवस्थित "ग्रीप' करू शकला नसावा. त्यामुळे तो सर्वोत्तम मारा करू शकला नाही. बटलरचा तडाखा सुरू होताच कुलदीपला पाचारण करण्यात आले. मग त्याच्या जादूमुळे सामन्याचे पारडे क्षणार्धात फिरले. 

त्यानंतर एका अशा फलंदाजाने "मास्टरपीस'ची छोटेखानी झलक सादर केली, जो येत्या काळात भारतीय क्रिकेट गाजविणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पणात मिचेल जॉन्सनच्या अत्यंत भेदक माऱ्याचा खंबीरपणे सामना केल्यापासून राहुलचा दर्जा वेगळाच दिसला आहे. राहुल इंग्लंडच्या गोलंदाजीची चौफेर धुलाई करीत असताना श्‍वास रोखला गेला होता. फलंदाजीसाठी आपला क्रम येण्याच्या प्रतीक्षेत असलेला कर्णधार विराटसुद्धा "डगआउट'मध्ये टाळ्या वाजवीत होता. इंग्लंडच्या आव्हान नसलेल्या गोलंदाजीला सामोरे जाताना रोहित शर्मा "बोअर' होऊन बाद झाला. मग विराटला आणखी जवळून ही खेळी पाहता आली. 

ही कामगिरी विजयाची अपेक्षा वाढविणारी आहे. इंग्लंड संघाने वेगाने बोध घेतला नाही आणि हवामानात अचानक बदल झाला नाही, तर हा मोसम भारतासाठी उत्साहवर्धक ठरण्याची अपेक्षा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunil gavaskar write about england tour