तळाच्या फलंदाजांच्या हल्ल्याचे दुखणे 84 वर्षांनंतरही कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 9 September 2018

भारतीय संघ आपली पहिली कसोटी 1932 मध्ये खेळला. त्या कसोटीत महम्मद निस्सार आणि अमर सिंगने इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट बाद केले होते. त्यांना फारशा धावा न देता निम्मा संघ बाद केला होता. त्या वेळी इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी चिकाटी, हिंमत दाखवली; तसेच त्यांना नशिबाची साथ लाभली. त्यांनी किल्ला लढवत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली आणि सामना भारताच्या हातून निसटला. 86 वर्षांनीही त्यात बदल झाला नाही. इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांना वर्चस्वापासून रोखले; तसेच इंग्लंड गोलंदाजांना भारतीय फलंदाजांवर दडपण आणण्याची संधी दिली. 

यापूर्वीच्या लढतीप्रमाणे जोस बटलरच इंग्लंडच्या मदतीस धावून आला. त्याने चांगल्या चेंडूवर छान बचाव केला आणि खराब चेंडूंचा पुरेपूर फायदा घेत इंग्लंडचा धावफलक हलता ठेवला. प्रत्येक एकेरी धाव तो आनंदाने घेत होता. प्रत्येक धाव मोलाची आहे, हे त्याने दाखवलेच; तसेच सहकारी फलंदाजांवर विश्वासही दाखवला. त्याच्या साथीत स्टुअर्ट ब्रॉड बहरला आणि त्यांनी वाढवलेल्या धावांनी भारताच्या दुःखावर डागण्याच दिल्या. 

भारतीय गोलंदाजांनी चांगला प्रतिकार केला होता. अखेरची कसोटी खेळणाऱ्या अलिस्टर कुकने मोईन अलीच्या साथीत भक्कम पायाभरणी केल्यानंतरही भारतीयांनी चिकाटीने प्रयत्न केले. कुक तसेच मोईन अलीने खेळपट्टीवर ठामपणे उभे राहत अर्धशतक केले. त्यानंतर बुमरा आणि ईशांतने सहा फलंदाजांना फारशा धावा न देता बाद केले. त्या वेळी इंग्लंडचे शेपूट दुसऱ्या दिवशी दुसऱ्या नव्या चेंडूवर झटपट गुंडाळले जाईल, अशी आशा वाटत होती; पण 1932 चीच पुनरावृत्ती झाली. (पीएमजी / ईएसपी) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunil gavaskar write about england tour