अनुराग ठाकूर, अजय शिर्केंना पदावरून हटविले

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

या निर्णयामुळे बीसीसीआयवर प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. लोढा समितीच्या शिफारसी लागू न करण्यात आल्याने हा आदेश देण्यात आला. बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटना पदाधिकाऱ्यांच्या समितीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यात अपयशी ठरल्याचा ठपला बीसीसीआयवर ठेवण्यात आला आहे.

नवी दिल्ली - क्रिकेट संघटनांमध्ये पादर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यात अपयशी ठरल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याचे आदेश आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले.

या निर्णयामुळे बीसीसीआयवर प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. लोढा समितीच्या शिफारसी लागू न करण्यात आल्याने हा आदेश देण्यात आला. बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटना पदाधिकाऱ्यांच्या समितीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यात अपयशी ठरल्याचा ठपला बीसीसीआयवर ठेवण्यात आला आहे. 

लोढा समितीने माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याची सूचना केली आहे. या प्रशासक समितीसंदर्भात गोपाल सुब्रह्मण्यम आणि फली नारिमन यांना नाव सुचविण्याचे आदेश दिले आहेत. ते भारतीय मंडळाचा दैनंदिन कारभार बघतील, अशी सूचना आहे. सध्या भारतीय मंडळाचा दैनंदिन कारभार सीईओ आणि विविध व्यवस्थापक बघतात. भारतीय मंडळाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी, तसेच विविध करारांचे निर्णय घेण्यासाठी प्रशासकांच्या नियुक्तीची सूचना केली आहे. न्यायालयाने एका प्रशासकाऐवजी समिती नेमण्याचे संकेत दिले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याबद्दल अनुराग ठाकूर यांच्याविरुद्ध सुनावणी सुरू करण्याबाबतही न्यायालय निर्णय देण्याची शक्‍यता आहे. ठाकूर यांनी माफी मागितली नाही, तर त्यांना तुरुंगात जावे लागेल, असा इशारा न्यायालयाने भारतीय मंडळाचे वकील कपिल सिब्बल यांना दिला आहे. यासंदर्भात ठाकूर यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. 

भारतीय क्रिकेट मंडळाच्या विविध खटल्यांबाबत निर्णय देणारे मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकूर हे 3 जानेवारीस निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

Web Title: Supreme Court removes Anurag Thakur from the post of BCCI President