मुंबईची घसरगुंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

राजकोट - तमिळनाडूचा पहिला डाव आटोक्‍यात आणल्यानंतरही मुंबईला रणजी उपांत्य लढतीत दुसऱ्या दिवशी चांगल्या सुरवातीचा फायदा उठवता आला नाही. दुसऱ्या दिवसअखेरीस पहिल्या डावात आघाडी घेण्याचे उद्दिष्ट बाळगणाऱ्या मुंबई संघाला १ बाद १११ अशा भक्कम सुरवातीनंतर ४ बाद १७१ अशा धावसंख्येवर समाधान मानावे लागले आहे. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक मुंबईच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले, तर आता आघाडीकडे बघताना श्रेयस अय्यर नाबाद असल्याचा दिलासा मुंबईला आहे.  तत्पूर्वी तमिळनाडूचा पहिला डाव ३०५ धावांत संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक - तमिळनाडू, पहिला डाव - ३०५ (अभिनव मुकुंद ३८, कौशिक गांधी ५०, बाबा इंद्रजित ६४, विजय शंकर ५०, शार्दुल ठाकूर ४-७५, अभिषेक नायर ४-६६).मुंबई, पहिला डाव - ४ बाद १७१ (प्रफुल्ल वाघेला ४८, सूर्यकुमार यादव ७३, आदित्य तरे खेळत आहे १९, श्रेयस अय्यर खेळत आहे २४, अश्‍विन क्रिस्ट १-४८, विजय शंकर १-१४)

Web Title: tamilnadu mumbai ranaji karandak