'वनडे'तील स्थान उंचावण्याची भारताला संधी

पीटीआय
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

दुबई: न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाने 4-1 असा विजय मिळविला, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीतील स्थान उंचावण्याची संधी भारताला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 असा विजय मिळवित भारताने कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळविले आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड सध्या तिसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघांमध्ये तीन गुणांचा फरक आहे. आगामी पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 4-1 असा विजय मिळविला, तर भारत न्यूझीलंडला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर दाखल होईल. प्रत्येक एकदिवसीय सामन्यानंतर 'आयसीसी'ची क्रमवारी बदलत असते.

गोलंदाजांच्या क्रमवारीत प्रथम स्थानी असलेला भारताचा आर. आश्‍विन न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये सहभागी होणार नाही. त्यामुळे ट्रेंट बोल्ट हा दोन्ही संघांमधील सर्वोत्तम मानांकन असलेला गोलंदाज असेल.

एकदिवसीय संघांचे मानांकन :

 1. ऑस्ट्रेलिया (118 गुण)
 2. दक्षिण आफ्रिका (116)
 3. न्यूझीलंड (113)
 4. भारत (110)
 5. इंग्लंड (107)
 6. श्रीलंका (101)
 7. बांगलादेश (95)
 8. पाकिस्तान (89)
 9. वेस्ट इंडीज (88)
 10. अफगाणिस्तान (52)
 11. झिंबाब्वे (46)
 12. आयर्लंड (42)

भारत विरुद्ध न्यूझीलंड : एकदिवसीय मालिकेचा कार्यक्रम

 • रविवार, 16 ऑक्‍टोबर : पहिला सामना, धरमशाला : दुपारी 1.30 पासून
 • गुरुवार, 20 ऑक्‍टोबर : दुसरा सामना, दिल्ली : दुपारी 1.30 पासून
 • रविवार, 23 ऑक्‍टोबर : तिसरा सामना, चंडिगड : दुपारी 1.30 पासून
 • बुधवार, 26 ऑक्‍टोबर : चौथा सामना, रांची : दुपारी 1.30 पासून
 • शनिवार, 29 ऑक्‍टोबर : पाचवा सामना, विशाखापट्टणम : दुपारी 1.30 पासून
Web Title: Team India can surpass New Zealand, if they beat visitors 4-1 in ODI series