सेंच्युरियनमध्ये विराट कोहलीची 'सेंच्युरी' 

Monday, 15 January 2018

सेंच्युरियन कसोटी सामन्यात भारतीय संघाला नितांत गरज असताना विराट कोहली विकेटवर खंबीर उभा राहिला. मॉर्केल, फिलॅंडर, रबाडा आणि एन्गिडी या सारख्या दर्जेदार वेगवान गोलंदाजांना धीराने सामोरे जात विराटने शतक साजरे केले म्हणून त्याचे मोल वेगळे आहे. दक्षिण आफ्रिकन संघाला 335 धावांवर रोखून गोलंदाजांनी परत एकदा चांगली कामगिरी केली होती.

सेंच्युरियन - धावा करणे आणि संघाला गरज असताना धावा करणे यात जमीन आसमामाचा फरक असतो. पाटा विकेट आणि सुमार गोलंदाजी असताना धावा करणारे बरेच फलंदाज बघितले पण दर्जेदार गोलंदाजी, परीक्षा बघणारी विकेट आणि दडपणाचा बोजा असताना चांगली खेळी उभारणारे जिगरबाज फलंदाज कमी असतात. भारतीय कर्णधार विराट कोहली त्यातला एक आहे. 

सेंच्युरियन कसोटी सामन्यात भारतीय संघाला नितांत गरज असताना विराट कोहली विकेटवर खंबीर उभा राहिला. मॉर्केल, फिलॅंडर, रबाडा आणि एन्गिडी या सारख्या दर्जेदार वेगवान गोलंदाजांना धीराने सामोरे जात विराटने शतक साजरे केले म्हणून त्याचे मोल वेगळे आहे. दक्षिण आफ्रिकन संघाला 335 धावांवर रोखून गोलंदाजांनी परत एकदा चांगली कामगिरी केली होती. केप टाउनच्या तुलनेत सेंच्युरियनची विकेट फलंदाजीला पोषक आहे. भारतीय फलंदाज या सामन्यात चमकणार अशी आशा वाटत असताना अत्यंत विचित्र चुका करत भारतीय फलंदाजांनी संकट ओढवून घेतले. चेतेश्‍वर पुजारा आणि हार्दिक पंड्या धावबाद झाले ते चांगल्या क्षेत्ररक्षणाने नव्हे तर मूर्ख चुका केल्याने. अशा पडझडीत उभा राहिला तो एकटा विराट कोहली. 

उजव्या स्टंप बाहेरचे चेंडू सोडताना कोहलीचा अंदाज अचूक होता. खराब चेंडूवर आक्रमक फटके मारताना तो कचरला नाही. 10 चौकारांसह कोहलीने 21वे कसोटी शतक पूर्ण केले आणि हवेत उंच उडी मारून आनंद व्यक्त केला. नाबाद कोहलीच्या खेळीवरच भारतीय संघाची मदार कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Team India Skipper Virat Kohli as brings up his 21st Test century