महिला क्रिकेट: भारताकडून थायलंडचा खुर्दा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

कोलंबो : भारताने विश्‍वकरंडक महिला क्रिकेट पात्रता स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदविला. भारताने थायलंडवर नऊ विकेट राखून मात केली. थायलंडचा 55 धावांत खुर्दा उडविल्यानंतर भारताने हे क्षुल्लक लक्ष्य 224 चेंडू राखून पार केले.

मानसी जोशीचा भेदक मध्यमगती मारा भारतासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. तिने तीन विकेट घेतल्या. 'सामन्याची मानकरी' तीच ठरली. 

थायलंडची कर्णधार सोर्न्नारीन तिप्पोच हिने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली; पण थायलंडच्या केवळ दोन फलंदाज 'डबल फिगर'मध्ये जाऊ शकल्या. अवांतर 12 धावा संयुक्त सर्वोच्च ठरल्या. तिप्पोच हिच्यासह चार जणींना खातेही उघडता आले नाही. चौथ्याच चेंडूवर शिखा पांडेने नत्ताकन चंताम हिला चार धावांवर पायचीत केले. त्यानंतर थायलंडने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. त्यांचा निम्मा संघ 18 धावांत गारद झाला होता. सातव्या विकेटसाठी 20 धावांची भागीदारी सर्वोत्तम ठरली. चानिदा सुथ्थीरुआंग हिला सुलीपोर्न लाओमी (8) हिची साथ मिळाली. भारताकडून सर्वच गोलंदाजांनी किफायतशीर मारा केला. 

हे आव्हान गाठण्यासाठी भारताला फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. हर्मनप्रीत कौरला तिप्पोचने बाद केले; पण त्यानंतर कामिनी आणि वेदाने औपचारिकता पूर्ण केली. 
भारत 'अ' गटात चार गुणांसह आघाडीवर आहे. श्रीलंका आणि आयर्लंडने एक विजय-एक पराभव अशा कामगिरीसह प्रत्येकी दोन गुण मिळविले आहेत. 

संक्षिप्त धावफलक 
थायलंड : 29.1 षटकांत सर्वबाद 55
(नत्ताया बुचाथम 10, चानिदा सुथ्थीरुआंग 12, अवांतर 12, शिखा पांडे 3-2-6-1, मानसी जोशी 5-4-4-3, दीप्ती शर्मा 5.1-2-8-2, पूनम यादव 6-2-10-2, राजेश्‍वरी गायकवाड 6-1-18-2, हर्मनप्रीत कौर 2-1-4-0, देविका वैद्य 2-2-0-0) पराभूत विरुद्ध भारत : 12.4 षटकांत 1 बाद 59 (हर्मनप्रीत कौर 15, थिरुष कामिनी नाबाद 24, वेदा कृष्णमूर्ती नाबाद 17, सोर्न्नारीन तिप्पोच 4-0-16-1) 

पुढील सामना : शुक्रवारी 
प्रतिस्पर्धी : आयर्लंड

Web Title: Team India womens cricket Cricket world cup India versus Sri Lanka