भारतीय महिलांचा धडाका कायम 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

कोलंबो : मिताली राजने बहारदार नाबाद पाऊण शतक करताना मोना मेश्रामसह 136 धावांची नाबाद भागीदारी केली आणि त्यामुळे भारताने विश्वकरंडक महिला पात्रता क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला 9 विकेट्‌स आणि 99 चेंडू राखत पराजित केले. 

भारतीय महिलांनी पहिली लढत जिंकल्यानंतरही काही टीकाकार भारतीयांचा विश्वकरंडकातील प्रवेश अद्याप निश्‍चित नाही. पाच संघांचे समान गुण होऊ शकतात, त्यात भारत मागे पडू शकतो, असे सांगत होते. त्यांना मिताली आणि मोनाच्या बहारदार फलंदाजीने गप्प केले. बांगलादेशला 8 बाद 155 असे रोखल्यावर भारतीयांनी 33.3 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. 

मितालीचे टायमिंग, चेंडूचे प्लेसमेंट, पदलालित्य भारत आणि बांगलादेश यांच्यातील तफावत दाखवत होते. तिच्या बहारदार खेळीने मोनाचा आत्मविश्वास उंचावला आणि बांगलादेशच्या विजयाच्या धूसर आशा दुरावल्या. दीप्ती शर्मा 22 चेंडूंत एक धाव करू शकली. ती परतली तेव्हा भारताची अवस्था 8.3 षटकांत एक बाद 22 होती. मितालीने सुरवातीस झटपट एकेरी धावा घेत दडपण दूर केले. षटकार मारून भारतास विजयी केलेली मिताली आणि मोनाने एकंदर 22 चौकार मारले. 

भारतीय संघास या विजयाने पूर्ण समाधान दिले नाही. बांगलादेशला दीडशेच्या आसपासच रोखले असले तरी, त्यांनी 9.3 षटकातील दोन बाद 14 नंतर पूर्ण 50 षटके फलंदाजी केली हे सलत होते. हेच नव्हे; तर धावचीतच्या दवडलेल्या दोन संधी आणि सुटलेला एक झेल ही चिंतेची बाब होती. त्याचबरोबर मितालीस एकता बिश्‍तच्या अनुपस्थितीत शर्मन अख्तर आणि फरगना हक यांनी तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी करताना फिरकीवर राखलेली हुकूमतही चिंता वाढवत असेल. दरम्यान, भारताची स्पर्धेतील अखेरची साखळी लढत पाकिस्तानविरुद्ध रविवारी (ता. 19) होईल. 

संक्षिप्त धावफलक 

बांगलादेश : 8 बाद 155 (शर्मीन अख्तर 35 - 82 चेंडूंत 4 चौकार, फरगना हक 50 -107 चेंडूंत 5 चौकार, निगार सुलताना 18, शीखा पांडे 10-2-26-1, मानसी जोशी 10-2-25-3, राजेश्वरी गायकवाड 7-1-34-1, देविका वैद्य 7-0-17-2)
पराभूत वि. भारत : 33.3 षटकात 1 बाद 158 (मोना मेश्राम नाबाद 78 - 92 चेंडूंत 12 चौकार, मिताली राज नाबाद 73 - 87 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकार).

Web Title: Team India womens cricket India versus Sri Lanka