दुसऱ्या कसोटी सामन्यासह दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

केपटाउन - कागिसो रबाडा याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना गुरुवारी २८२ धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत दुसरा सामना जिंकून त्याने मालिकेत विजयी आघाडी घेतली. विजयासाठी ५०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत श्रीलंकेचा डाव २२४ धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात चार गडी बाद करणाऱ्या रबाडाने ५५ धावांत सहा गडी बाद केले. संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका ३९२ आणि ७ बाद २२४ घोषित वि.वि. श्रीलंका ११० आणि दुसरा डाव २२४ (एंजेलो मॅथ्यूज ४९, दिनेश चंडिमल ३०, रबाडा ६-४४, फिलॅंडर ३-४८)

Web Title: test cricket series win south africa