esakal | ऑस्ट्रेलियात दिवस-रात्र कसोटी नाहीच
sakal

बोलून बातमी शोधा

bcci

गेली दोन वर्षे ऑस्ट्रेलिया दौरा करणारा प्रत्येक संघ ऑस्ट्रेलियात दिवस-रात्र कसोटी खेळतोच असे चित्र आहे; पण भारत दिवस-रात्र कसोटी खेळणार नाही, यावर "बीसीसीआय' ठाम राहिले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दौऱ्यातील ऍडलेड येथे होणारा पहिलाच कसोटी सामना दिवस-रात्र खेळवण्याची तयारी केली होती. 

ऑस्ट्रेलियात दिवस-रात्र कसोटी नाहीच

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - या वर्षअखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत दिवस-रात्र कसोटी खेळणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अधिकृतरीत्या कळवले. 

गेली दोन वर्षे ऑस्ट्रेलिया दौरा करणारा प्रत्येक संघ ऑस्ट्रेलियात दिवस-रात्र कसोटी खेळतोच असे चित्र आहे; पण भारत दिवस-रात्र कसोटी खेळणार नाही, यावर "बीसीसीआय' ठाम राहिले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दौऱ्यातील ऍडलेड येथे होणारा पहिलाच कसोटी सामना दिवस-रात्र खेळवण्याची तयारी केली होती. 

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीच या दिवस-रात्र कसोटीस विरोध केला होता. दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी किमान अठरा महिने तयारी करावी लागेल, असे कारण देत शास्त्री यांनी आपला विरोध व्यक्त केला होता. 

"अजून एक वर्षाने आम्ही दिवस-रात्र कसोटी सामना खेळू, असे प्रशासक समितीने कळवले असल्यामुळे आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी खेळू शकत नाही. सर्व सामने लाल चेंडूवरच खेळविले जातील,' असे बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 
भारतात दुलिप करंडकाचे सामने दिवस-रात्र खेळविले जात असले तरी, संघातील नियमित सदस्य असणाऱ्या चेतेश्‍वर पुजारा, मुरली विजय यांनाच गुलाबी चेंडूने खेळायची सवय आहे. ऑस्ट्रेलियाने मात्र मायदेशात खेळला गेलेला प्रत्येक दिवस-रात्र सामना जिंकला आहे. 
 
loading image