क्रिकेट लढतीतून नाणेफेकच रद्द? 

वृत्तसंस्था
Friday, 18 May 2018

आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीतून सामन्यापूर्वी होणारी नाणेफेक रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यजमान संघास खेळपट्टीचा मिळणारा फायदा कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची क्रिकेट समिती ही शिफारस करण्याची शक्‍यता आहे. या महिनाअखेरीस मुंबईतच होणाऱ्या आयसीसी क्रिकेट समितीच्या बैठकीत हा मुद्दा ऐरणीवर राहणार आहे. या समितीचे अनिल कुंबळे अध्यक्ष आहेत. 
 

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीतून सामन्यापूर्वी होणारी नाणेफेक रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यजमान संघास खेळपट्टीचा मिळणारा फायदा कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची क्रिकेट समिती ही शिफारस करण्याची शक्‍यता आहे. या महिनाअखेरीस मुंबईतच होणाऱ्या आयसीसी क्रिकेट समितीच्या बैठकीत हा मुद्दा ऐरणीवर राहणार आहे. या समितीचे अनिल कुंबळे अध्यक्ष आहेत. 

1877 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी झाली होती, तेव्हापासून नाणेफेक हा प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्याचा भाग आहे. या वेळी यजमान कर्णधार नाणेफेक करतो; तर पाहुणा कर्णधार याबाबतचा कौल मागतो; मात्र काही वर्षांपासून यजमानांनी खेळपट्टी आपल्याला अधिकाधिक अनुकूल करण्यास सुरवात केली आहे, त्यामुळे नाणेफेकीस फारसा अर्थच राहिलेला नाही. 

यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंग याने सर्वप्रथम ही मागणी केली होती. त्यानंतर हळूहळू या बदलास पाठिंबा वाढत आहे. इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट स्पर्धेतून यापूर्वीच नाणेफेक बाद झाली आहे. भारतीय मंडळ देशांतर्गत स्पर्धेत याची अंमलबजावणी करण्याची शक्‍यता आहे. नाणेफेक रद्द झाल्यापासून सामने जास्त चुरशीचे होत आहेत, तसेच पूर्णवेळ होत आहेत, असा दावा इंग्लंड कौंटी पदाधिकारी करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: toss is cancel in to cricket