esakal | ‘टॉस का बॉस’ कसोटी क्रिकेटमध्ये कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Toss-Ka-Boss

‘टॉस का बॉस’ कसोटी क्रिकेटमध्ये कायम

sakal_logo
By
पीटीआय

मुंबई - टी-२०च्या युगात कसोटी क्रिकेटमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची ‘आयडिया’ मागे पडली आहे. नाणेफेक ‘बाद’ करण्याची सूचना अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील ‘आयसीसी’ क्रिकेट समितीने फेटाळून लावली आहे. याशिवाय अखिलाडू वर्तन तसेच चेंडू कुरतडण्याविरुद्ध कठोर कारवाई होईल.

या समितीच्या मुंबईतील बैठकीत नाणेफेकीच्या बाजूने कौल लागला. नाणेफेक हा क्रिकेटचा अविभाज्य भाग असल्याविषयी एकमत झाले. पाहुण्या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल आधीच द्यावा अशी शिफारस होती. त्यास समितीमधील कुंबळे यांच्यासह माईक गॅटींग, माहेला जयवर्धने, न्यूझीलंडचे विद्यमान प्रशिक्षक माईक हेसन, ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू व सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी विरोध दर्शविला. त्याचवेळी यजमान देशाने जागतिक कसोटी स्पर्धेला साजेशा दर्जेदार खेळपट्ट्या बनवाव्यात. या खेळपट्ट्या ‘स्पोर्टिंग’ असाव्यात, असेही आवर्जून नमूद केले.

या समितीने वेगवेगळ्या शिफारशी केल्या. प्रतिस्पर्धी संघ आणि खेळाडूंमध्ये एकमेकांविषयी आदराची संस्कृती पुन्हा निर्माण व्हावी, या उद्देशाने काही शिफारशी करण्यात आल्या.

क्रिकेट समितीच्या शिफारशी
     चेंडू कुरतडण्याविरुद्धची कारवाई आणखी कठोर करणे
     आक्रमक, वैयक्तिक, अपमानास्पद किंवा हेतुपुरस्सर शिवीगाळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे नवे स्वरूप ठरविणे
     फायदा मिळण्यासाठी अवैध मार्गांच्या अवलंबाविरुद्ध नव्या कारवाईची आखणी
     आदरसंहितेची (कोड ऑफ रिस्पेक्‍ट) निर्मिती
     सामनाधिकाऱ्यांना गैरवर्तन किंवा कारवाईची पातळी ठरविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार

loading image