बोल्ट दुसऱ्या कसोटीस मुकणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

वेलिंग्टन (न्यूझीलंड) - न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट उद्या शुक्रवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यास मुकणार आहे. पायाच्या दुखापतीत सुधारणा नसल्याने त्याला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी टीम साऊदीचा समावेश करण्यात आला असून, फलंदाज नील ब्रूम या सामन्यातून कसोटी पदार्पण करेल. तो जखमी रॉस टेलरची जागा घेईल. त्याचबरोबर तीन वेगवान गोलंदाज खेळविण्याचा निर्णय उद्या खेळपट्टी पाहूनच घेण्यात येईल, असे न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाने सांगितले. तीन वेगवान खेळविण्याचा निर्णय झाल्यास जीतन पटेल किंवा मिशेल सॅंटनेर यांच्यापैकी एकाला संघात स्थान मिळेल.
Web Title: trent boult not involve in second test match