ओडिशाला बावीस वर्षांनी पुन्हा कसोटी केंद्राचा दर्जा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

भुवनेश्‍वर - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी ओडिशाच्या बाराबत्ती स्टेडियमला बावीस वर्षांनी पुन्हा कसोटी केंद्राचा दर्जा दिला. मुंबई येथे झालेल्या सर्वसाधरण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

भुवनेश्‍वर - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी ओडिशाच्या बाराबत्ती स्टेडियमला बावीस वर्षांनी पुन्हा कसोटी केंद्राचा दर्जा दिला. मुंबई येथे झालेल्या सर्वसाधरण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

या संदर्भात ओडिशा क्रिकेट संघटनेचे सचिव आशीर्वाद बेहरा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ""गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच खरे, तर हा दर्जा मिळायला हवा होता. पण, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान झालेल्या टी 20 सामन्यातील दुर्दैवी घटनेनंतर बीसीसीआयने या संदर्भातील निर्णय राखून ठेवला होता. या घटनेनंतर बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना पुन्हा अशा घटना येथे घडणार नाही. आम्ही बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांशी बांधील असू, अशी खात्री दिल्यानंतर बीसीसीआयने आमच्या विनंतीचा फेरविचार केला आणि बावीस वर्षांनी ओडिशाला कसोटी केंद्राचा दर्जा मिळाला.''

बारबत्ती स्टेडियमवर 1987 मध्ये कसोटी सामना झाला होता. त्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर विजय मिळविला, तसेच कपिलदेवने त्या सामन्यात आपला तीनशेवा कसोटी बळी मिळविला होता. त्यानंतर 1995 मध्ये या मैदानावर भारत-न्यूझीलंड हा अखेरचा कसोटी सामना झाला. हा सामना पावसामुळे वाया गेला. न्यूझीलंडच्या पूर्ण झालेल्या डावात नरेंद्र हिरवाणीने 59 धावांत 6 गडी बाद केले. हीच या मैदानावरील सर्वोच्च कामगिरी आहे.

Web Title: Twenty-two years later, again in Orrisa Test center status