यंदाच्या क्रिकेट मोसमात तब्बल दोन हजार सामने 

वृत्तसंस्था
Thursday, 19 July 2018

आगामी स्थानिक क्रिकेट मोसमात विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये तब्बल दोन हजारपेक्षा जास्त सामने रंगतील. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार ईशान्येकडील राज्यांना सामावून घेण्यात आले आहे. त्या संघांचा रणजी प्लेटसह वन-डे व टी-20 स्पर्धांतही सहभाग राहील. 

नवी दिल्ली- आगामी स्थानिक क्रिकेट मोसमात विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये तब्बल दोन हजारपेक्षा जास्त सामने रंगतील. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार ईशान्येकडील राज्यांना सामावून घेण्यात आले आहे. त्या संघांचा रणजी प्लेटसह वन-डे व टी-20 स्पर्धांतही सहभाग राहील. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2018-19 मोसमाचा कार्यक्रम जाहीर केला. ऑगस्टमध्ये मोसम सुरू होईल. आधी महिला टी-20 चॅलेंजर स्पर्धा आणि त्यानंतर पुरुषांची दुलिप करंडक स्पर्धा होईल. 

पावसामुळे पेच 
ईशान्येकडील राज्यांत मोसमाच्या सुमारास पाऊस पडतो. त्यामुळे तयारीवर परिणाम होऊ शकेल. याविषयी "बीसीसीआय'शी चर्चा करावी लागेल, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 

"आयपीएल'साठी संधी 
मुश्‍ताक अली टी-20 स्पर्धेत 37 संघ असतील. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना "आयपीएल'साठी संधी मिळविता येईल. ज्युनिअर व युवा खेळाडूंसाठी कर्नल सी. के. नायडू, विनू मांकड, कुचबिहार, विझी या स्पर्धा होतील. 

दृष्टिक्षेपात 
- रणजी स्पर्धेने मोसमाचा प्रारंभ करण्याच्या परंपरेत बदल 
- दुलिप स्पर्धेनंतर हजारे व देवधर करंडक स्पर्धा 
- त्यानंतर रणजीचे आयोजन 
- रणजी करंडक स्पर्धेत एकूण 37 संघ 
- नऊ नव्या संघांचा समावेश 
- प्लेट विभागातील नऊ संघ ः अरुणाचल प्रदेश, बिहार, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅंड, पुदुच्चेरी, सिक्कीम, उत्तराखंड 
- प्लेट विजेता पुढील मोसमात "क' गटात 
- "क' गटातील पहिले दोन संघ पुढील मोसमात "अ' व "ब' गटांत 
- तिन्ही गटांतील तळातले संघांची "प्लेट'मध्ये पदावनती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two thousand matches in this year's cricket season