मनज्योत कालरा भारताच्या विजयाचा शिल्पकार

Saturday, 3 February 2018

मनज्योत कालरा या 19 वर्षीय क्रिकेटपटूने सलामीला येत अप्रतिम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. डावखुऱ्या या फलंदाजाची शैली पाहिल्यावर युवराजसिंगची झलक त्याच्यामध्ये दिसते. मनज्योतने खराब चेंडू सीमापार पाठवत धाव जमाविल्या. 

माउंट मौंगनुई (न्यूझीलंड) : 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाला चौथ्यांदा विश्वकरंडक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला तो सलामीवीर मनज्योत कालरा या खेळाडूने. मनज्योतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावा करण्याची आपली लय अंतिम सामन्यातही कायम ठेवली. मनज्योतने १०१ चेंडूंत शतक झळकाविले.

मनज्योत कालरा या 19 वर्षीय क्रिकेटपटूने सलामीला येत अप्रतिम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. डावखुऱ्या या फलंदाजाची शैली पाहिल्यावर युवराजसिंगची झलक त्याच्यामध्ये दिसते. मनज्योतने खराब चेंडू सीमापार पाठवत धाव जमाविल्या. 

मनज्योतने आतापर्यंत भारताकडून 19 वर्षांखालील स्पर्धांमध्ये खेळलेल्या सामन्यांमध्ये एकच अर्धशतक झळकाविले होते. तेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळी स्पर्धेत झालेल्या सामन्यामध्ये. त्याने या स्पर्धेच्या सुरवातीलाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात 86 धावांची खेळी केली होती. यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही महत्त्वपूर्ण 47 धावा केल्या होत्या. अखेर त्याने अखेरच्या सामन्यात शतकी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: u19cwc indvsaus Manjot Kalra scored century in India australia final