esakal | बीसीसीआयकडून भारतीय संघाला बक्षीस जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI

या विजयानंतर बीसीसीआयने भारतीय संघाचे अभिनंदन करताना रोख रक्कमेच्या स्वरुपात बक्षीस जाहीर केले आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याला सर्वाधिक 50 लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे. तर, संघातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी 20 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

बीसीसीआयकडून भारतीय संघाला बक्षीस जाहीर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

माउंट मौंगनुई (न्यूझीलंड) : एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव करत विश्वविजेतेपद मिळविले. या विजयानंतर बीसीसीआयने भारतीय संघाचे अभिनंदन करताना रोख रक्कमेच्या स्वरुपात बक्षीस जाहीर केले आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याला सर्वाधिक 50 लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे. तर, संघातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी 20 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

याबरोबरच संघ व्यवस्थापनातील प्रत्येक सदस्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमाविलेला नाही. भारताच्या विजयानंतर द्रविडच्या मार्गदर्शनाचे कौतुक करण्यात येत आहे. 

loading image