INDvsSA : अपील न करताच पंचानी दिलं आऊट; पाहा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 October 2019

सामन्यात एक मजेशीर प्रसंग घडला आहे. रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पंचांनी अपील न करताच फलंदाजाला बाद दिल्याची घडना घडली आहे.

पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं आफ्रिकेवर 1 डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात एक मजेशीर प्रसंग घडला आहे. रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पंचांनी अपील न करताच फलंदाजाला बाद दिल्याची घडना घडली आहे.

जडेजानं गोलंदाजीमध्ये कमाल केली. मुथुस्वामी फलंदाजी करत असताना जडेजानं ऑफ स्टम्पजवळ चेंडू टाकला. हा चेंडू फिरून फलंदाजाच्या पॅडला लागला. मात्र खेळाडूंनी चेंडू बाहेर गेला असे समजून अपील केले नाही मात्र, पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केले.
 

त्यानंतर मुथुस्वामीनं रिव्ह्युही घेतला, मात्र निर्णय पंचाच्या बाजूनं लागला. फलंदाजांनी बाद दिल्यावर जडेजाही थोडासा चक्रावल्यासारखा झाला होता. परंतु रिव्ह्यूनंतर तिसऱ्या पंचांचाही निर्णय बदलला नाही.

भारताचा अकरावा मालिका विजय

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं आफ्रिकेला डोकं वर काढण्यासाठी जागा दिली नाही. पहिल्या दिवशी टीम इंडियानं 601 धावांचा डोंगर उभारल्यानंतर आफ्रिकेला 275 धावांवर बाद करत फॉलोऑन दिला. त्यानंतर आफ्रिकेला सामना जिंकण्याची कोणतीही संधी टीम इंडियानं दिली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umpire Gives Senuran Muthusamy Out LBW Without An Appeal