पंचांच्या निर्णयाचा फटका कोणाला तरी बसणारच - बुमरा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

बंगळूर - पंचाचा निर्णय कधीही दोन्ही संघांना फायद्याचा नसतो. त्याचा एका संघाला फटका बसतोच, अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा याने व्यक्त केली.

बंगळूर - पंचाचा निर्णय कधीही दोन्ही संघांना फायद्याचा नसतो. त्याचा एका संघाला फटका बसतोच, अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा याने व्यक्त केली.

दुसऱ्या टी- २० सामन्यात इंग्लंड कर्णधार इऑन मॉर्गन याने पंचांच्या निर्णयामुळे आम्ही हरलो अशी टीका केली होती. या विषयी बुमराला विचारले असता, तो म्हणाला, ‘‘पंचाच्या निर्णयाचा एका संघाला फटका बसणारच. आम्ही पंचांच्या निर्णयाचा विचार करत नाही. असे प्रकार खेळात घडणारच. ते विसरून पुढे जायचे असते.’’ याच सामन्यात बुमराची गोलंदाजी निर्णायक ठरली होती. त्याने टाकलेल्या अखेरच्या दोन षटकांत सामन्याचे चित्र पालटले होते. बुमरा म्हणाला, ‘‘आशिष नेहरासह अनेक सामन्यांत गोलंदाजी केली आहे. जागतिक टी- २० स्पर्धेतही त्याच्याबरोबर गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. माझ्यापेक्षा तो अधिक खेळला असल्यामुळे त्याचे अनुभवाचे बोल नेहमीच उपयोगी ठरतात.’’ 

बुमराच्या गोलंदाजीत कमालीची अचूकता होती. पण, ती प्रत्येक सामन्यात राखणे कठिण असते, असे सांगून तो म्हणाला, ‘‘या सामन्यात गोलंदाजी केली तसाच टप्पा या सामन्यातही राखला जाईल हे सांगता येत नाही. खेळपट्टीनुसार प्रत्येक वेळेस चेंडू टाकण्याचे नियोजन बदलावे लागते. मोठे मैदान असले की स्लोअर वन चेंडू टाकणे फायद्याचे ठरते. पण, छोट्या मैदानावर त्याचा फटका बसतो.’’

दुसऱ्या सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षणदेखील खराब झाले. मात्र, बुमराने ते फेटाळून लावले. तो म्हणाला, ‘‘जेव्हा, दव पडलेले असते, तेव्हा क्षेत्ररक्षण करणेदेखील कठिण असते. दवामुळे चेंडू ओला होऊन तो जड झालेला असतो. त्यामुळे उंचावून आलेले झेल घेणेदेखील कठिण असते. अर्थात, आम्हाला कारणे द्यायची नाहीत. यावर मात करण्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत.’’

Web Title: Umpire's decision to knock someone