esakal | World Cup 2019 : ...तर पाकिस्तानच जिंकणार विश्वकरंडक?
sakal

बोलून बातमी शोधा

World Cup 2019 : ...तर पाकिस्तानच जिंकणार विश्वकरंडक?

पाकिस्तानच्या यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीने मायदेशात त्यांच्याविषयी संताप व्यक्त होत असला, तरी कुणी काही म्हणा 1992 आणि 2019 स्पर्धेतील त्यांचा प्रवास बघितला, तर त्यांच्यासाठी योगायोग जुळून येतोय. 

World Cup 2019 : ...तर पाकिस्तानच जिंकणार विश्वकरंडक?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 :
पुणे ः पाकिस्तानच्या यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीने मायदेशात त्यांच्याविषयी संताप व्यक्त होत असला, तरी कुणी काही म्हणा 1992 आणि 2019 स्पर्धेतील त्यांचा प्रवास बघितला, तर त्यांच्यासाठी योगायोग जुळून येतोय. 

पाकिस्तान संघ 1992 मध्ये विश्‍वकरंडक स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या मार्गावर होता. मात्र, कर्णधार इम्रान खानने स्वतः पुढे येऊन कामगिरी करताना सहकाऱ्यांना नुसतेच प्रेरित केले नाही, तर पुढे जाऊन विश्‍वकरंडकही जिंकला. या स्पर्धेत त्यांना प्रेरित करणारा इम्रान खान नसला, तरी योगायोग जुळून येत आहे. क्रिकेट पंडित तसे आडाखेच बांधू लागले आहेत. या दोन्ही स्पर्धेतील पाकिस्तानच्या सामन्याचा आढावा घेतला, तर ते तुम्हालाही समजून येईल. 

सामना  1992 स्पर्धा   2019 स्पर्धा 
पहिला    पराभव           पराभव 
दुसरा     विजय            विजय 
तिसरा   नो-रिझल्ट     नो-रिझल्ट 
चौथा    पराभव           पराभव 
पाचवा   पराभव          पराभव 
सहावा   विजय           विजय 
सातवा   विजय           विजय

पाकिस्तानने त्या वेळी सहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळविला. त्यानंतर सातव्या आणि आठव्या सामन्यात त्यांनी अनुक्रमे श्रीलंका, न्यूझीलंडवर मात केली. त्यानंतर उपांत्य फेरीत पुन्हा न्यूझीलंडला पराभूत केले आणि अंतिम फेरीत इंग्लंडला शह देत विजेतेपद मिळविले. 

आणखी एक विशेष योगायोग म्हणजे 1992 मध्ये पाकिस्तानने सहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी विजय मिळविला. सामन्याचा मानकरी ठरला अमीर सोहेल. आता 2019 मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर 49 धावांनी विजय मिळविला आणि सामन्याचा मानकरी ठरला हॅरिस सोहेल.

loading image