आशियाई जेतेपदाची हॅटट्रिक 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

कोलंबो - भारतीय कुमार संघाने शुक्रवारी 19 वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. कर्णधार अभिषेक शर्माच्या (29 धावा आणि 4-37) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्यांनी अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेचा 34 धावांनी पराभव केला. भारताने यापूर्वी 2012 आणि 2004 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. 

भारतीय संघाच्या 274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 48.4 षटकांत 239 धावांतच संपुष्टात आला. श्रीलंकेने 3 षटकांतच 27 धावा करताना जोरात सुरवात केली होती. पण, चौथ्या षटकांत त्यांनी विश्‍वा चतुरंगा याची विकेट गमाविली. त्यानंतर त्यांचा जोश ओसरला. रिवन केली आणि हसिथा बोयागोडा यांनी श्रीलंकेला 10 षटकरांत 1 बाद 79 पर्यंत नेऊन ठेवले. मात्र, फिरकी गोलंदाजी सुरू झाल्यावर धावांची गती वाढवण्याच्या नादात बोयागोडा (37) बाद झाला. तेव्हा 19 षटकांत त्यांची स्थिती 2 बाद 105 अशी झाली होती. त्यानंतरही केलीने कर्णधार कमिंडू मेंडिसच्या साथीत श्रीलंकेला 150 पर्यंत नेऊन ठेवले. डावाच्या 31व्या षटकांत केली (61) बाद झाला. कर्णधार मेंडिसने यानंतरही श्रीलंकेचे आव्हान राखले होते. पण, शर्माने मेंडिस आणि क्रिशन अराचिगे यांना बाद करून श्रीलंकेला 41 षटकांत 5 बाद 201 असे अडचणीत आणले. त्या वेळी चहर याने श्रीलंकेच्या आव्हानातील हवा काढून घेताना त्यांची अवस्था 9 बाद 225 अशी केली. त्याने 22 धावांत 3 गडी बाद केले. 

त्यापूर्वी हिमांशु राणा आणि शुभम गिल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 8 बाद 273 धावांची मजल मारली होती. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. राणाने 71 चेंडूंत 79, तर गिलने 90 चेंडूत 70 धावा केल्या. शेवटी कमलेश नागरकोटीच्या 14 चेंडूतल्या 23 धावांच्या खेळीने भारताचे आव्हान भक्कम झाले. 

संक्षिप्त धावफलक ः 
भारत 50 षटकांत 8 बाद 273 (राणा 71, गिल 70, रंसिका 3-50) वि.वि. श्रीलंका 48.1 षटकांत 239 (केली 62, मेंडिस 53, शर्मा 37-4, चहर 3-22) 

Web Title: Under 19 Asia Cup cricket