फखर झमानचा अनोखा विक्रम 

वृत्तसंस्था
Monday, 23 July 2018

झटपट एक हजार धावा करणारे फलंदाज 
डाव फलंदाज 
18 फखर झमान (पाकिस्तान) 
21 व्हिव रिचर्डस (विंडीज), केविन पीटरसन (इंग्लंड), जोनाथन ट्रॉट (इंग्लंड), क्वींटॉन डी कॉक (द. आफ्रिका), बाबर आझम (पाकिस्तान) 
23 गॉर्डन ग्रिनीज (विंडीज), रायन टेन डोएश्‍चेट (नेदरलॅंड्‌स), अझर अली 

 

बुलावायो- पाकिस्तानचा फलंदाज फखर झमानने रविवारी क्रिकेट विक्रमाच्या पुस्तकात आपल्या कामगिरीचे नवे पान जोडले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये झटपट एक हजार धावा आणि सलग तीन डावांत नाबाद राहिल्यानंतर बाद होण्याची अनोखी कामगिरी त्याने झिंबाब्वेविरुद्ध केली. 

झिंबाब्वेविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत झमान आज पाचव्या सामन्यात बाद झाला. मालिकेतील पहिल्या सामन्यात तो बाद झाला होता. त्यानंतर तो थेट आज पाचव्या सामन्यातच बाद झाला. या कालावधीत त्याने 455 धावा केल्या. ही एकदिवसीय क्रिकेटमधील अनोखी कामगिरी ठरली. त्याने पाच सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक 515 धावा केल्या. 

या सामन्यात तो तिसऱ्या शतकापासून वंचित राहिला. तो 85 धावांवर बाद झाला. या अर्धशतकी खेळीत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये झटपट एक हजार धावा करण्याची कामगिरीदेखील केली. त्याने 18 डावांत एक हजार धावा केल्या. यापूर्वी 21 डावांत एक हजार धावा करण्याची कामगिरी पाच फलंदजांनी केली आहे. झमानने या मालिकेत पाच डावांत 60, नाबाद 117, नाबाद 43, नाबाद 210 आणि 85 अशा धावा केल्या. झमानने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन शतके आणि पाच अर्धशतके झळकाविली आहेत. 

झटपट एक हजार धावा करणारे फलंदाज 
डाव फलंदाज 
18 फखर झमान (पाकिस्तान) 
21 व्हिव रिचर्डस (विंडीज), केविन पीटरसन (इंग्लंड), जोनाथन ट्रॉट (इंग्लंड), क्वींटॉन डी कॉक (द. आफ्रिका), बाबर आझम (पाकिस्तान) 
23 गॉर्डन ग्रिनीज (विंडीज), रायन टेन डोएश्‍चेट (नेदरलॅंड्‌स), अझर अली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique record of fakhar zaman in ODI